पिकविम्याला ग्रहण कुणाचे, राजकारणाचे की आचारसंहितेचे ?
पिकविम्याला ग्रहण कुणाचे, राजकारणाचे की आचारसंहितेचे ?
शेतकऱ्यांत व्यक्त होतोय संताप.
मुल( प्रती)
मुल तालुक्यातील उर्वरित धान उत्पादक शेतकऱ्यांना पिक विमा 2023 ची नुकसान भरपाई अजूनही मिळाली नाही. विविध राजकीय पक्षांकडून शेतकऱ्यांना मोठमोठी आश्वासने देण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पिक विम्याला ग्रहण कुणाचे? याबाबत शेतकऱ्यांकडून संशय व्यक्त केल्या जात आहे
नैसर्गिक आपत्तीत नुकसान होत असल्याने पीक विमा हा एक पर्याय शेतकऱ्यांसमोर आहे. मात्र
पिकाचा विमा काढला तरी भरपाई वेळेत मिळतच नाही, असाच अनुभव तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आला आहे.
मुल तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान उत्पादनाचे क्षेत्र आहे. तर कापूस, सोयाबीन लागवड़ीखालील क्षेत्रही बरेच आहे. मात्र दरवर्षी बदलत्या हवामानाचा धान उत्पादक शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
अवकाळी पाऊस पड़णे अशा अनेक कारणमुळे
उत्पन्नावर परिणाम होत आहे.पिकाच्या नुकसानीला रोखण्यासाठी पीक विमा उतरविण्याचे आवाहन शासनाने केले होते. त्यानुसार तालुक्यातील धान उत्पादक शेतकर्यांनी दि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी कडून विमा घेतला. मात्र, तालुक्यातील नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांना अद्यापही पिक विमा मिळाला नाही. तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी पीक विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत.
"दोन महिन्यापूर्वी तालुक्यातील काही निवडक शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात आली.उर्वरित शेतकऱ्यांचा(एमआयएस) डाटा नुसार नुकसानग्रस्त पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली. पात्र शेतकऱ्यांनी खटाटोप केल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम लवकरच देण्यात येईल असं सांगण्यात आले".
परंतु अजूनही पिक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना पिकविण्याची रक्कम अदा करण्यात आली नसल्याने पिक विमा रकमे बाबत शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!