आपण जनतेची उमेदवार — डॉ. अभिलाषा गावतुरे



आपण सक्षम असतांनाही कॉंग्रेसने आपल्याला उमेदवारी नाकारली, मात्र जनतेच्या प्रेमापोटी, या भागातील जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी आवश्यक असल्यांने आपण जनतेची उमेदवार म्हणून रिंगणात आहोत, असे मत बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राच्या अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केले.  डॉ. गावतुरे यांनी आज त्यांचे मूल येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेवून विविध मुद्यांवर आपले मत व्यक्त केले.

सहा महिण्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणूकीत आपण कॉंग्रेस उमेदवार श्रीमती प्रतिभा धानोरकर यांचा प्रचार केला.  बल्हारपूर मतदार संघातून त्यांना मोठी आघाडी मिळाली.  या भागातील ओबीसीना न्याय देण्यासाठी आपण विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरण्यांचा निर्णय घेतला.  कॉंग्रेसकडे उमेदवारी मागीतली. उमेदवारी देण्यांचा शब्दही देण्यात आला मात्र वेळेवर आरक्षण विरोधी, व्यापारी असलेले संतोष रावत यांना उमेदवारी दिली. ते डमी उमेदवार आहेत असा आरोप डॉ. गावतुरे यांनी केला.

बल्हापूर निर्वाचन क्षेत्रात बेरोजगार, शेतकर्यांचे, महिलांचे प्रश्न गंभीर आहेत.  शिक्षणाची वाट लागली आहे.  गोंडवाणा विद्यापिठाचा दर्जा घसरला आहे.  दवाखाण्याच्या चांगल्या इमारती आहेत, मात्र आवश्यक कर्मचारी नाहीत. शेतमालाला भाव नाही, घराचे पट्टे नाही, पुरेसे घरकुल नाही, वाघाचे हल्ले वाढत आहे.  येथील प्रतिनिधीत्व करणारे मंत्री मुनगंटीवार यावर काही करीत नाही असा आरोप त्यांनी केला.

आपली लढत ही, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेशीच असून जनता आपल्याला मोठ्या मताधिक्याने विजयी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आपण अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतर, उमेदवारी मागे घ्यावी यासाठी आपलेशी कुणीही संपर्क साधला नसल्यांचे त्यांनी एका प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!