अवैध्यरित्या रेती उत्खनन करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वर वनविभाग कार्यालय चिमूर यांची जोरदार कारवाई
तालुका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
चिमूर : - दिनांक.०८/१०/२०२४ ला शंकरपुर उपवनक्षेत्रांर्गत येत असलेल्या मौजा महारमजरा रिठ संरक्षीत वन कक्ष क्रमांक. ४६८ मध्ये अवैध्यरित्या रेती उत्खनन व वाहतुक प्रकरणी वनधिकाऱ्यांनी दोन ट्रॅक्टर रेतीसह जप्त केले.घटनेची हकीकत अशी आहे की नवतळा नियतक्षेत्रात वनाधिऱ्यांनी गस्ती दरम्यान ट्रॅक्टरचा जंगलात आवाज आल्याने त्या भागात गेले असता तीथे दोन टॅक्ट्रर रेती भरलेले दिसले.पाहणी केली असता त्या टॅक्ट्ररचे नंबर एम.एच. ३४ बि.एफ.१२२९ विना नंबरच्या ट्रॉलीसह १०० घ.फु. रेतीसह व दुसरे टैक्ट्रर एम.एच. ३३ व्ही. ५३०८, विना नंबरच्या ट्रॉलीसह व ५० घ.फु. रेतीसह व फावडे घमेलेसह आढळुन आले. सदर टॅक्ट्रर मालकाबाबत चौकशी असता एम.एच. ३४ बि.एफ. १२२९ हे टैक्ट्रर भुषन दिवाकर दडवे रा. शंकरपुर (वय ३० वर्ष) व एम.एच. ३३ व्ही. ५३०८ हे हरीदास जनार्धन कोटरंगे रा. कोसारी पो. मानापुर तह. आरमोरी जि. गडचिरोली यांचे मालकीचे असल्याचे निदर्शनास आले. दोन टॅक्ट्रर सोबत आरोपी ड्रायव्हर प्रमोद शंकर नन्नावरे (३० वर्षे), भारत शालीक मानकर (३५ वर्ष), मजुर सागर मधुकर रंदये (२१ वर्षे), आशीष माधव नन्नावरे (२१ वर्ष), मोरेश्वर गुलाबराव रंदये (२७ वर्षे), प्रमोद राधो रंदये (३० वर्षे), गौरव जमन दडमल (१९ वर्षे), अभय रमेश रंदये (२६ वर्षे), सर्व राहनार शंकरपुर यांचेवर भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ३३ ( १ ) (b), ४१, ४२ ( १ ) नुसार वनगुन्हा क्रमांक. ०१९१४८/२२८६८६/२०२४ दिनांक.०८/१०/२०२४ ला गुन्हा नोंद करुन दोन्ही टॅक्ट्रर एकुण १५० घ.फु. रेतीसह ४ फावडे, ८ घमेले जप्त करुन दोन्ही टॅक्ट्रर वनपरीक्षेत्र कार्यालय चिमुर येथे जमा केले. प्रकरणाचा तपास मा. किशोर देऊरकर वनपरीक्षेत्र अधिकारी चिमुर यांचे मार्गदर्शनात संतोष औतकर वनपरीमंडळ अधिकारी शंकरपुर हे करीत असून कार्यवाही दरम्यान कालीदास गायकवाड, वनरक्षक, विशाल सोनुने वनरक्षक, राहुल सोनुने वनरक्षक, प्रदीप ढोणे, गस्त पथकचे नैताम वनपाल, पोटे वनरक्षक, जगदिश लांजेवार, सुनील लांजेवार हे उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!