मूलच्या 'या' माजी नगराध्यक्षांचा कॉंग्रेस प्रवेश

 

मूल शहराचे माजी नगराध्यक्ष विजय चिमड्यालवार यांनी आज कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला.  महाविकास आघाडीचे उमेदवार, कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांचे उमेदवारीचे समर्थनार्थ श्री. चिमड्यालवार यांनी पक्षात प्रवेश घेतल्यांने संतोष रावत यांना त्यांचे प्रवेशाचा फायदा होईल असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.  मागील काही वर्षापूर्वी कॉंग्रेसचेच चिमड्यालवार यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नेतृत्वात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी श्री. रावत यांनी त्यांचे कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.  या पत्रकार परिषदेपूर्वी श्री. विजय चिमड्यालवार यांनी पक्ष प्रवेश केला.  बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राच्या विकासाकरीता आपली उमेदवारी असून, जे प्रश्न मागील अनेक वर्षापासून सुटले नाही, ते प्रश्न सोडविण्यांचा आपण प्रयत्न करीत असल्यांचे त्यांनी पत्रकारांचे प्रश्नाचे उत्तरात सांगीतले.  स्थानिक एमआयडीसीत उद्योग आहेत, मात्र मजूर परप्रांतीय आहेत, या उद्योगात स्थानिक कामगारांना काम मिळेल याकरीता आपण प्रयत्न करणार असल्यांचे सांगीतले.  यावेळी लाडक्या बहीणसह अनेक प्रश्नावर त्यांनी उत्तरे दिलीत.

पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे नेते संदीप गड्डमवार, विजय चिमड्यालवार, गुरूदास गुरूनुले प्रकाश कागदेलवार, राकेश रत्नावार यांचेसह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!