तर मुनगंटीवारांचा नवा विक्रम ठरेल!

 तर मुनगंटीवारांचा नवा विक्रम ठरेल!



विधानसभेचे वारे वाहू लागले आहे.  प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरूवातही झालेली आहे.  राज्यात महायुती कि महाविकास आघाडी? यावर मतदारांच्या चर्चेच्या फेरी झडत आहेत.  बल्हारपूर निर्वाचन क्षेत्रात यंदा काय? हा प्रश्नही चर्चीला जात आहे.  त्याचे कारणही तसेच आहे.  भाजपाचे दिग्गज नेते, राज्याचे वने व सांस्कृतीक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार हे यावेळी रिंगणात राहणार आहे.  मागील लोकसभा निवडणूकीत त्यांना या क्षेत्रातून मिळालेली पिछाडीचे रूपांतरण विजयाचे मताधिक्यात कसे करणार? याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.

महायुतीकडून सुधीर मुनगंटीवार यांचे नांव भाजपाच्या पहिल्याच यादीत आले असले तरी, महाविकास आघाडीत ही जागा कोण लढविणार? यावर अजूनही सस्पेंस कायम आहे.  कॉंग्रेसचे संतोष रावत, घनश्याम मुलचंदानी, डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे नांव चर्चेत आहे मात्र ही जागा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडेही जावू शकते ही बाब आता स्पष्ट झाली आहे.  यामुळेच बल्हारपूरची सीट नेमकी कोणता पक्ष लढवेल यावरच पुढचे सारे गणित अवलंबून आहे.  मागील अनेक महिण्यापासून तरी, बल्हारपूरच्या मैदानात एकटे मुनगंटीवारच खेळत असल्यांने, त्यांना ही निवडणूक अडचणीची जाणार नाही असे जाणकाराचे मत आहे.

सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा बल्हारपूर क्षेत्रातून 'आमदार' म्हणून बाजी मारल्यास, ते नविन विक्रम करणार आहे.  विदर्भात सलग सात वेळा निवडूण येण्यांची एकालाही संधी मिळाली नाही.  मुनगंटीवार विजयी झाल्यास, हा विक्रम त्यांचे नांवे होणार आहे.  चंद्रपूर जिल्हयात डबल हॅट्रीक करणारे सुधीर मुनगंटीवार हे पहिलेच नेते आहेत.  ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून 1995, 1999, 2004 या वर्षात सलग तीन वेळा तर, बल्हारपूर मतदार संघातून 2009, 2014 आणि 2019 या वर्षी सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडूण आले आहे.  त्यांचे खालोखाल वरोरा मतदार संघातून डॉ. संजय देवतळे हे पाच वेळा आमदार म्हणून निवडूण आले आहेत.  सलग सहा वेळा निवडूण येणारे सुधीर मुनगंटीवार हे विदर्भातील एकमेव आमदार आहेत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!