भाजपचे क्रिष्णा राऊत सह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश - विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले स्वागत
सावली - भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले सावलीचे क्रिष्णा राऊत यांनी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कार्यावर विश्वास ठेऊन काँग्रेस पक्षात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. यामुळे भाजप पक्षात खळबळ माजली आहे.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सावली तालुक्यातील भटक्या जातीतील समाजाला हजारो घरकुल मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले व इतर विकासाची कामे तालुक्यात झपाट्याने होत असल्याचे क्रिष्णा राऊत यांनी नुकतेच पार पडलेल्या सावली येथे भोई समाज मेळाव्यात सुतोवाच केले होते. क्रिष्णा राऊत हे सावली ग्रामपंचायतीचे उपसरपंच व पंचायत समितीचे उपसभापती, सभापती पदावर राहिलेले असून भोई समाजात धांडगा जनसपंर्क आहे. आज ब्रम्हपुरीत विजय वडेट्टीवार यांचे उपस्थितीत उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार यांचे मार्गदर्शनात क्रिष्णा राऊत सह वैशाली सोनकर, देवानंद मानकर, नीलकंठ भोयर, संजय मेश्राम यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षप्रवेशामुळे भाजप पक्षात खळबळ माजली आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते भोई समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत असल्याने व विरोधीपक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांचा भोई समाजाप्रती असलेला कळवळा व विकासाचा दृष्टिकोन बघून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.
श्री. क्रिष्णा राऊत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!