मूल तालुक्यातील १२ गावांच्या वनहक्क व्यवस्थापन आराखडयांना मिळणार तालुकास्तरीय कन्वर्जन्स समिती कडून मान्यता.
मूल तालुक्यातील १२ गावांच्या वनहक्क व्यवस्थापन आराखडयांना मिळणार तालुकास्तरीय कन्वर्जन्स समिती कडून मान्यता.
मूल
आदीवासी विकास विभाग च्या जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत तहसील कार्यालय मुल येथील सभागृहात सामुहीक वनहक्क व्यवस्थापन आराखडा करीता दिनांक २७/९/२०२४ रोजी तालुका स्तरीय कार्यशाळा पार पडली.
या कार्यशाळेत कृती आराखड्यातील करावयाच्या कामांचे नियोजन, शिवार फेरी,सिमांकन करुन अंतीम नकाशा तयार करणे,ग्रामसभा नरेगा, व सी,एफ,आर, एम.सी, चे बॅंक खाते उघडणे,ग्रामसभेला नरेगाची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नरेगा साईटवर अपलोड करणे,गस्ती पथक तयार करणे, ग्रामस्थांची नियमावली व गस्ती पथक नेमनूक करणे, सुक्ष्म आराखडे तयार करणे, पारंपारीक बाबीं सह नजरी नकाशा तयार करणे, सुक्ष्म आराखड्यातील कामाचे अभिसरण करुन संबंधीत विभागाकडे प्रस्ताव सादर करुन मंजुरी नंतर अंदाजपत्रके तयार करणे, गौण वन उपज,फळबागा, वनऔषधी, मासेमारी,बंधारे तलाव खोलीकरण करणे, वैयक्तीक व सामुहीक योजनांचा अभिसरण करुन ग्रामसभा मार्फत क्रीयान्वीत करणे, ठक्कर बाप्पा, गोदाम बांधकाम, कलम 3/2 अंतर्गत सामुहीक विकासाची कामे करणे. वन गौण उपज गोळा करणे,व प्रक्रीया करण्यासाठी उद्योग उभारणे,ईत्यादी विषयांवर चर्चा घडवुन आणण्यात आली.
सदर कार्यशाळा मूल चे गटविकास अधिकारी राठोड सर यांच्या अध्यक्षतेखाली व मूलचे वनपरिक्षेत्र अधिकारी, नायब तहसीलदार, ग्रामसभा प्रतिनिधी, वनहक्क समन्व्यक,
प्राप्त सर्व गावातील तलाठी, ग्रामसेवक ग्रामरोजगार सेवक,नरेगा विभागाचे अधिकारी, टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईचे प्रतिनिधी,यांच्या प्रमुख. मार्गदर्शनाखाली पार पडली, या कार्यशाळेला सामुहीक वनहक्क. समीत्यांंचे अध्यक्ष सचिव कोषाध्यक्ष,व प्रमुख पदाधिकारी, क्षेत्र सहाय्यक ,वनरक्षक व एफईएस संस्थेचे प्रतिनिधी व इतर विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!