स्वाब संस्थेचा मल्हार गणेश मंडळातर्फे वाढोणा येथे सत्कार.
तळोधी (बा.):
जय मल्हार गणपती मंडळ समिती वाढोणा यांच्या वतीने आज वाढोणा येथे स्वाब संस्थेच्या पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात सतत सुरू असलेल्या कामगिरी बद्दलची दखल घेत स्वाब संस्थेचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळेस परिसरात पर्यावरण व सामाजिक क्षेत्रात शासकीय यंत्रणेला व परिसरातील जनतेला सुद्धा नैसर्गिक आपत्तीचे वेळी किंवा कोणत्याही कार्यात पर्यावरण संवर्धनासाठी झटणारी वृक्षारोपण, जंगल परिसरातील धार्मिक स्थळ, पर्यटन स्थळ, तलाव, नदी , रस्ते या ठिकाणी सतत प्लास्टिक कचरा गोळा करून स्वच्छतेचा अभियान राबवणारी, सतत कोणत्याही शासकीय, अशासकीय यंत्रणेला झाडांचा पुरवठा करून वृक्ष लागवड करण्यास मदत, साप किंवा कोनत्या ही संकटग्रस्त वन्यजीव, पुरपरिस्थीती किंवा रस्त्यावरील अपघात, जंगलातील अपघात, असो पोलीस विभाग, वन विभाग असो की वैयक्तिक लोकांना सुद्धा मदतीचा हात देत सतत निस्वार्थ कार्य करणाऱ्या स्वाब संस्थेचे कार्य लक्षात घेत हा सत्कार करण्यात आला.
"हा सत्कार संस्थेच्या निस्वार्थपणे व सातत्याने सहकार्य करणाऱ्या संस्थेच्या प्रत्येक सदस्यांचा सत्कार आहे. आणि हे मिळालेले सत्कार आमच्या कार्याकरिता प्रेरणादायी ठरतात." असे संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर यांनी या सत्काराच्या वेळेस बोलताना सांगितले. या केलेल्या सत्कार बद्दल संस्थेच्या वतीने जय मल्हार गणेश मंडळाचे आभार मानण्यात आले. या सत्कार समारंभच्या वेळेस स्वाब संस्थेचे बचाव दल प्रमुख जिवेश सयाम, शिक्षण विभाग प्रमुख नितीन भेंडाळे, कोषाध्यक्ष गोपाल कुमले, सर्पमित्र विकास लोणबले, अमन करकाडे, शुभम निकेसर इत्यादी सदस्य उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!