पवनी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे उद्घाटन

प्रथमच नावीन्यपूर्ण उपक्रम 

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दिनांक १५ सप्टेंबर २०२४, रविवार ला शासकीय आय.टी.आय पवनी, जिल्हा भंडारा येथे संविधान मंदिराचा उद्घाटन समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.सामाजिक न्यायाची खरी शिकवण हि भारताच्या संविधानातून प्राप्त होत असल्यामुळे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग अंतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय आय.टी.आय. व शासकीय तांत्रिक विद्यालयाअंतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना सामाजिक न्यायाची खरी शिकवण मिळावी यासाठी मा.ना. मंगलप्रभात लोढा, मंत्री, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून शासकीय आय.टी.आय. पवनी येथे संविधान मंदिराची स्थापना करण्यात आली.संविधान मंदिराचे उद्घाटन आभासी पद्धतीने जगदीप धनखड, उपराष्ट्रपती, भारत सरकार यांच्या शुभ हस्ते दि. १५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपस्थित गंगाधर जिभकाटे, अध्यक्ष, जि. प. भंडारा हे प्रमुख उद्घाटक म्हणून लाभले तर महेंद्र सोनोने, तहसीलदार, पवनी हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले होते. प्रमुख अतिथी म्हणून राजेश घार्गे, अध्यक्ष, संस्था व्यवस्थापन समिती, द्वारा शासकीय आय.टी.आय. पवनी तथा जनरल मॅनेजर (एच. आर.), अशोक लेलॅंड कंपनी, गडेगांव, भंडारा, संदीप नंदरधने, सदस्य, संस्था व्यवस्थापन समिती, शासकीय आय.टी.आय. पवनी, ॲड. शरद सावरकर, ॲड. देवीदास तुळसकर, क्षिरसागर , अशोक लेलॅंड कंपनी गडेगांव भंडारा हे लाभले होते. सदर कार्यक्रमाचे औचित्य साधून पिपिपी योजने अंतर्गत संस्थेत नुतनीकरणा अंतर्गत सर्व सोयींनी सुसज्ज स्मार्ट क्लासरुम तथा संगणक कक्ष तसेच कान्फरंस हॉल चे सुद्धा उद्घाटन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी भाजीपाले (लोकमत),  महादेव शिवरकर ( पुण्यनगरी), मनोहर मेश्राम (बर्फातील ज्वाला), लियाकत अली सय्यद ( नवभारत) तसेच संस्थेतील प्रशिक्षणार्थी, त्यांचे पालक वर्ग व इतर स्थानिक प्रतिष्ठीत मान्यवर उपस्थित होते. हा संपूर्ण कार्यक्रम संस्थेच्या प्राचार्या सौ. नीता पिसे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेतील कर्मचारी किशोर शेंडे तर आभार प्रदर्शन विजय कुमार घडोले, प्रभारी गटनिदेशक यांनी केले. याप्रसंगी संस्थेत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त प्रशिक्षणार्थ्यांना मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेतील सर्व कर्मचारी तथा प्रशिक्षणार्थ्यांचे सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!