चिमूर नगरपरिषदेणे गणपती विसर्जनाची केली केली विटंबना

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - गणेश चतुर्थी हा गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची पूजा केल्याने भक्ताला बुद्धी, समृद्धी व सौभाग्य प्राप्त होते, असे मानले जाते. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून गणेशोत्सव सुरू होतो. हा उत्सव १० दिवस मोठया थाटामाटात साजरा केला जातो. या निमित्ताने अनेक स्पर्धा सुद्धा राबविण्यात येतात. यामुळे गावातील नागरिक सर्वजण एकत्र येऊन गणेशोत्सव उत्साहात साजरा करतात. व घरगुती गणेश विसर्जन करण्यासाठी नगर परिषदेने लावलेल्या विसर्जन कुंडातील पाण्यामध्ये गणेशजीचे विसर्जन केले जाते. परंतु असे असतांना देखील चिमूर नगरपरिषदेने शहरात सर्वत्र ठिक - ठिकाणी लावलेल्या विसर्जन कुंडाच्या लोखंडी फ्रेम काढून गणपतीच्या मुर्त्यांची विटंबना केल्या गत अवस्था त्या जागेवर झाल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. १० दिवस मूर्ती पूजा व मूर्तीची जपणूक केली जाते आणि अशाप्रकारे नगर परिषदेकडून मूर्तीची विटंबना केली जात असेल तर शासकीय नियमानुसार नगर परिषदेवर कारवाई व्हायला हवी अशी चर्चा शहरात सर्वत्र सुरु आहे.या सर्व घटनेची दखल घेत माहिती मिळताच क्षणी विनोद गंगाधरराव ढाकूनकर माजी नगर सेवक तथा तालुका उपाध्यक्ष व इतर नागरिकांनी मिळून चिमूर पोलीस स्टेशन ला नगर परिषदेच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या घटनेमुळे चिमूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!