आनंद निकेतन महाविद्यालयात "ग्रंथ"प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न....
आनंद निकेतन महाविद्यालयात "ग्रंथ"प्रदर्शनी कार्यक्रम संपन्न....
वरोरा.... जगदीश पेंदाम
महावाचन उपक्रमा अंतर्गत आनंद निकेतन महाविद्यालय तसेच पंचायत समिती वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले...
विद्यार्थ्यां मध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, पुस्तके विद्यार्थ्यांचे मित्र व्हावेत तसेच वाचन कला वृध्दींगत व्हावी या हेतूने महावाचन उपक्रमा अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
प्रदर्शनाचे अध्यक्ष महविद्यालायचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे सर,उद्घाटक गटशिक्षणाधिकारी चहारे सर, मार्गदर्शक ग्रंथपाल डॉ. संजय साबळे तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य राधा सवाने, माजी विस्तार अधिकारी राऊत, केंद्रप्रमुख चिडे, नौकरकर उपस्थित होते वरोऱ्यातील विविध शाळांतील 102 विद्यार्थी व त्यांचे शिक्षक या कार्यक्रमात सहभागी झाले.
या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन मारोती मुंडे यांनी केले .ग्रंथ प्रदर्शनी करिता ग्रंथालयातील कर्मचारी चिमुरकर, शिर्के,थुटे, साखरे व मगरेताई यांचे विशेष सहकार्य लाभले...


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!