शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास शिवसेना (उ.बा.ठा.) करेल तीव्र आंदोलन
शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास शिवसेना (उ.बा.ठा.) करेल तीव्र आंदोलन
पंकज तडस :-
वर्धा :
शिवसेना जिल्हा प्रमुख ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) आशिषभाऊ पांडे यांच्या नेतृत्वात सन 2023 मध्ये झालेल्या गारपीट मधील नुकसान झालेल्या शेतकरी बाधवांना आजच्या तारखेपर्यंत अजूनही नुकसान भरपाई मिळाली नाही. पण ज्या शेतकरी बाधवांना नुकसान भरपाई मिळाली नाही त्याला पुर्णताहा त्या त्या गावातील पटवारी जबाबदार आहे. त्यांनी हा सर्वे तोंड पाहुन केलेला आहे असा आरोप तालुक्यातील शेतकरी करत आहे. यामध्ये चिंचाळा, टाकळी, अडेगाव, गिरोली, दापोरी, गौळ या गावातील बहुतांश शेतकरी बांधवाचा समावेश आहे. शेतकरी बांधवाना तात्काळ त्यांची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने तहसिलदार देवळी व कृषी अधीकारी देवळी यांना निवेदन देण्यात आले. शेतकरी बांधवाना न्याय मिळाला नाही तर शिवसेना तिव्र आंदोलन करेल अशी ग्वाही दिली. निवेदन देते वेळी वर्धा जिल्हा प्रमुख आशिष पांडे, रमेशभाऊ कडु उपजिल्हा प्रमुख , पंकज झोरे जिल्हा समन्वयक, संदिप कुचे तालुकासंघटक,बाबारावजी पवार, अविनाश इंगोले उपतालुकाप्रमुख, नितीन वाघ विभाग प्रमुख, संभव इंगोले युवा सेना तालुकाप्रमुख, नितेश भानारकर शहर संघटक, मनोज अहल्ले, आकाश डगवार , रंगराव हरणे, बालु माहुरे, गोविंदराव ऊईके,
शशांक हरणे, पांडुरंग पोराटे, रमेश हरणे, गजानन लवनकर, चंद्रभानजी मडावी, मारोतराव पोराटे, गोपाळराव ऊईके, सुखदेव अहल्ले, बहल डुकरे निखिल भाकरे, शंकर मसराम, अशोक हरणे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी, शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!