नेहरु विद्यालयातील ७ खेळाडु विभागीय स्तरावर
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेदाम )
वरोरा : - जिल्हा क्रिडाअधिकारी कार्यालय चंद्रपूरच्या अंतर्गत जिल्हा क्रिडा संकुल चंद्रपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरीय शालेय कॅरम क्रिडा स्पर्धेत नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बूज च्या सात खेळाडुनी शालेय कॅरम वयक्तीक क्रिडा स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करीत विभागीय स्तरावर प्रवेश मिळविला. विभागीय क्रिडा स्पर्धा भंडारा येथे होणार आहे. या क्रिडा स्पर्धेत वयोगट १४ मध्ये युगा निखारे आणि अनुराग मेश्राम वयोगट १७ मध्ये समृध्दी शेरकी दुस-या क्रमांक व चैतन्या गिरडे सहाव्या क्रमांकावर तसेच वयोगट १९ मध्ये लक्ष्मी कोटकर प्रथम क्रमांक, प्रेम सोनुने द्वितीय क्रमांक, तृप्ति कोटकर सहाव्या क्रमांकवर विजयी झाले. विजयी खेळाडुचे गोल्ड मेडल देऊन तसेच या खेळाडुचे प्रशिक्षक कन्नाके सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. या स्पर्धेत विजय प्राप्त करणा-या खेळाडुचे शाळेचे मुख्याध्यापक ढाकुणकर सर यांनी कौतुक करीत पुढील स्पर्धेत सहभागासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हात एकाच शाळेचे शालेय वयक्तीक कॅरम स्पर्धेत सात खेळाडु विजयी सर्वत्र कौतुक होत आहे. कन्नाके सरांच्या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन व आभार मानण्यात आले. विजयी खेळाडुचे चांगले, हिवरकर, वरभे, मत्ते, कु.आसुटकर, बनकर, कडुकर, सोनवाने, उरकुडे व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!