नागभीड नगरपरिषदला १२३ कोटी निधीची प्रशासकीय मान्यता.
आम.किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाला यश, शहरात भुमिगत गटारी नाल्यात बनणार...!!!
नागभीड: महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या नगरोस्थान महाभियांतर्गत नागभीड नगरपरिषद शहराच्या मलनिस्सारण प्रकल्पास राज्य शासनाने १० सप्टेंबरला १२३ कोटी रुपये निधीची प्रशासकीय मान्यता दिली आहे.त्यामुळे आता शहरात भुमिगत गटारी नाल्याचे बांधकाम होणार आहे. यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.११ एप्रिल २०१६ रोजी नागभीड नगरपरिषदेची राज्य शासनाने स्थापना केली.त्यात नागभीड सह नवखळा, डोंगरगाव (बूज), बाम्हणी,बोथली, भिकेश्वर,चिखल परसोडी,तुकुम, तिव्हर्ला, खैरीचक, चिंचोली,एकुण दहा गावांचा समावेश करण्यात आला आहे. जवळपास या नगरपरिषदेला साडे सहा वर्षांचा कालावधी पूर्ण होत आहे.नगरपरिषद क्षेत्रात बरीच विकात्मक कामे झाली आहेत.त्यात पुन्हा १२३ कोटी निधीची भर पडली असुन आता पर्यंत हा सर्वात मोठा निधी आहे. या निधीतून शहरात भुमिगत गटारी नाल्या बांधल्या जाणार असल्याने शहरात स्वच्छता राहणार दिसून येणार आहे.संचलनालय मार्फत संदर्भातील क्र १० घ्या पत्रकान्वये राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समिती कडे सादर करण्यात आला होता.या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण नागपूर विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे.या मान्यतेसाठी २६ जुलै २०२४ ला पत्र सादर केले होते.या निधी साठी सतत आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी पत्राद्वारे पाठपुरावा केला होता.अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे.त्यामुळे.नगरपरिषदचे माजी उपाध्यक्ष गणेश तर्वेकर,माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे,माजी बांधकाम सभापती सचिन आकुलवार.कृ.उ.बा.समीतीचे सभापती आवेश पठाण,भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके यांनी आमदार भांगडिया यांचे स्वागत केले आहे.
•आमदार बंट्टीभाऊ भांगडिया यांच्या प्रयत्नातून नागभीड नगरपरिषदेला १२३ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.या निधीतून भुमिगत गटारी नाल्या बांधकाम होणार असून, नागभीड शहर पुन्हा सुंदर व स्वच्छ होणार आहे.त्यासाठी आम.बंट्टीभाऊ भांगडीया यांचे आभार.
-गणेश तर्वेकर माजी उपाध्यक्ष नगरपरिषद नागभीड.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!