जखमी मोराला दिले जीवदान
तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )
वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेत शिवारात जखमी मोर असल्याची माहिती प्रशांत ठेंगणे व विजय ठेंगणे यांनी फोन द्वारे तुळाणा व करंजी शिवारा परिसरा जवळ मोर जखमी अवस्थेत असल्याची माहिती देण्यात आली. वनरक्षक वरोरा लगेचच आपले सहकारी घेऊन जखमी अवस्थेत असलेल्या मोराच्या ठिकाणी जाऊन मोराला रेस्क्यू करून सतिश के.शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांच्या मार्गदर्शनात डॉ. राहुल शेंद्रे पशुवैद्यकीय अधिकारी वरोरा यांच्या कळे उपचार करण्यात आले. जखमी असलेल्या मोराला डॉक्टरच्या सल्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय वरोरा येथे सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले.मोराला आठ दिवस उपचारासाठी ठेवून योग्य तो उपचार करण्यात आला.जखमी मोराचे परिपूर्ण उपचार झाल्यानंतर दि. 31/08/2024 रोजी सतिश के. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा यांच्या मार्गदर्शनात कक्ष क्र.8 चारा गवत विकास केंद्र टेमुर्डा येथे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यावेळी उपस्थित सतिश के. शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी वरोरा, अमोल डी. तिखट वनरक्षक वरोरा, सुरज चिडे,आकाश नन्नावरे, बंटी खडके, देशपांडे, पवन काळे आदी वनकर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!