वनविभागा कडून त्या पट्टेदार वाघाचा बंदोबस्त करून तात्काल जखमी झालेल्याना मदत द्या - केवलसिंग जुनी शिवसेना उपतालूका प्रमुख (उ.बा.ठा) यांची मांगणी


उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चिमुर तालूक्यात मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांवर हल्ले होत आहे. एकाच दिवसी पट्टेदार वाघाने ४ शेतकऱ्यांवर हल्ला करून जखमी केले अश्या प्रकारे अनेक ठिकानी नेहमीच वन्य प्राण्याकडून शेतकरी, गुराखी, व अन्य सामान्य लोकांवर हमले होत आहे. यामध्ये अनेकांना जिव गमवावे लागले त्यांचे संसार उघड्यावर पडले असून दिलेली मदत अल्प अशी असून आजन्म पुरणारी नसल्याने शासन जनतेची थट्टा उडवीत आहे.अनेक शेतकरी जखमी होऊन त्यांना आजन्म अपंगत्व आले आहे.अश्या नागरीकांना वनविभागा कडून तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी.व या वन्य प्राण्याचे बंदोबस्त करण्यात यावे. शेतकऱ्यांना शेतामध्ये जाने व शेतातील काम करने तारेवरची कसरत करण्यागत  झाले आहे.वाघाची व डूकरांची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने गावा - गावात तसेच शहरात घरांमध्ये वन्य प्राणी आपले राहण्याचे ठिकान शोधतांना दिसत आहे.त्यामुळे नागरीकांचे घराबाहेर निघणे सुद्धा कठीन झाले आहे.आणि या वन्य प्राण्यापासून शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उभ्या पिकांची नासधूस होत असते. तसेच पाळीव प्राण्याचे वन्य प्राणी यांवरही हल्ले करून ठार केल्याच्या सुद्धा घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या असून त्याबाबत नुसकान भरपाई वन विभागा कडून योग्य प्रमाणात घटनास्थळी जाऊन भेट देऊन योग्य मदत देण्यात यावी.कधी कुणाचे चेहरे पाहून पंचनामे केली जाते,तर कुणाकडून टक्केवारी घेऊन थातुरमातुर तपास तर कुना कडून ओली पार्टी घेतली जाते अश्या प्रकारची पंचनामे वनविभागा कडून होत असते. अशी चर्चा नेहमीच बघावयास मिळते.बरेश्या लोकांना नियमित वेळेवर नुसकान भरपाई मिळत नाही. अश्या अधिकारी व कर्मचाऱ्याची वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कसून चौकसी करून कार्यवाही करण्यात यावी.अश्या प्रकाराची मागणी केवलसिंग जुनी शिवसेना उपतालुका प्रमुख (उ.बा.ठा) यांचेकडून करण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!