अंगावर वीज पडल्याने शेतकरी ठार
दिनांक 15 आगस्ट ला सायंकाळी 5 ते 6 वाजता च्या दरम्यान घडली.
सावली तालुक्यातील गेवरा बुज येथील युवा शेतकरी विनोद आत्माराम वाकडे वय 36 वर्ष हा शेतातून वापस येत असतानाच त्याच्या अंगावर वीज पडल्याने तो ठार झाला.
सायंकाळी च्या सुमारास मोठ्या प्रमाणात या परिसरात विजेचा कळकळाट झाला होता आणि काही वेळातच एक युवक गोसेखुर्द च्या नाल्याजवळ पडला असल्याची माहिती मिळाली.
शिवसेना सावली तालुका प्रमुख लीलाधर चुधरी यांनी या संदर्भात प्रशासनाला माहिती दिली. तसेच पाथरी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
एक चांगला युवक शेतकरी मरण पावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दोन दिवसांपूर्वी केरोडा येथे विजे मुळे महिला ठार झाली होती. व गंभीर आहे. आणि आज ही घटना झाल्याने शेतकरी भयभीत झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!