नोकरदाराच्या कुटुंबात राशन धान्य दुकान मंजूर - चांदली बुज. येथे कार्डधारकांमध्ये खळबळ
सावली - तालुक्यातील चांदली बुज येथील सरकारी स्वस्त राशन दुकानदाराचा मृत्यू झाला व वारस हक्कानुसार कुटुंबातील व्यक्तींना राशन दुकान देण्याचा शासकीय परिपत्रक आहे मात्र मुलगा कर्मचारी असल्याने सुनेला दुकान देण्यात आल्याने चांदली बुज. गावात खळबळ माजली आहे.
सावली तालुक्यातील चांदली बुज. येथे मनोहर जागोबाजी टेप्पलवार यांचेकडे अनेक वर्षांपासून शासकीय धान्य दुकान होते. त्यांचा वृद्धापकाळाने फरवरी 2024 मध्ये मृत्यू झाला. त्यांना वयोवृद्ध पत्नी, नोकरीवर असलेले दोन्ही मुले वारस आहेत. त्यामुळे सदर दुकान तात्पुरते सावली दुकानदाराला जोडण्यात आले. मात्र वाटप सुनील टेप्पलवार करीत होते. ते एका सरकारमान्य खाजगी शाळेत लिपिक पदावर असल्याने कार्डधारकांना नियमित धान्याचा पुरवठा होत नसल्याने ग्रामपंचायत चांदली बुज. यांनी ठरावासह जाहीरनामा काढण्यासाठी तहसीलदार सावली यांना पत्र दिले. त्यावर तहसीलदार सावली यांनी वारस हक्काने त्यांची सून ज्योती सुनील टेप्पलवार यांना राशन धान्य दुकानाचा परवाना देण्यात आल्याचे कळविले आहे. याबाबत गावकऱ्यांमध्ये तर्क लावल्या जात आहे की, सून वारस कशी व पती कर्मचारी असतांना पत्नीला दुकान देण्याचा हा कसला नियम. ज्यांच्या नावाने दुकान देण्यात आले ते मुल येथे राहतात. त्याऐवजी बचत गट, बेरोजगार युवक यांना देण्याची मागणी होत आहे. राशन दुकान हे नियमबाह्यरित्या देण्यात आल्याने रद्द करून नव्याने जाहीरनामा काढण्याची मागणी सरपंच विठ्ठल येगावार यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!