तलाठ्यांचा चोरट्याना आशीर्वाद
दिवस रात्र रेती चोरीचा चोरटा उपक्रम सुरूच
उप संपादक
विलास मोहिनकर
चंद्रपूर : - चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर खुलेआम सर्रासपने रेती चोरीचा उपक्रम सुरु असून चोरीची रेती ट्रॅक्टर द्वारे वाहतूक करतांना चक्क तलाठी ट्रॅक्टर पकडून कारवाई न करता सोडून देतात यास काय म्हणावे ? शासकीय कर्मचारी दिवसा ढवळ्या अशाप्रकारे चोरटा उपक्रम राबवित असतांना गावांमध्ये भेटी गाठी घेत असतात तर जनता विश्वास ठेवणार तरी कुणावर अशी स्थिती आज चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यामध्ये झाली आहे. चक्क तहसील कार्यालयासमोरुन चोरीच्या रेतीची वाहतूक केली जाते याकडे उपविभागीय अधिकारी असो वा तहसीलदार तसेच मंडळ अधिकारी व तलाठी कुणीही कारवाई का करीत नाहीत हे यावरून सिद्ध होते. शासनाने अनेक शासकीय इमारतींची बांधकामे मंजूर केली असून या इमारत बांधकामावरच चोरीची रेती सर्रास वापरली जात आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!