विकासासोबतच विस्तारीकरण करावे -- नगराळे

विकासासोबतच विस्तारीकरण करावे
-- नगराळे


" चंद्रपूर दीक्षाभूमीच्या विकासासाठी व सौंदर्यीकरणासाठी महाराष्ट्र शासनाने 57 कोटी चा निधी मंजूर केला , ही स्वागतार्ह्य बाब असली तरी या दीक्षाभूमीला फार कमी जागा उरल्याने लगतचे चांदा क्लब ग्राउंड दिक्षाभूमीला देण्यात यावे , अन्यथा विकासाला व सौंदर्यीकरणाला अर्थ उरणार नाही " अशी वास्तविकता वंचितचे नेते तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराळे यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचेकडे प्रकट केली . या संबधाने राज्याचे मुख्यमंत्री यांचेकडे अलीकडेच बहुजन हितकारिणी सभेने एक निवेदन पाठविले आहे , त्याचा पाठपुरावा स्थानिक लोकप्रतिनिधिनी करावा याचा आग्रह धरण्यासाठी नगराळे यांचे नेतृत्वात दिनांक 17 ऑगष्ट ला, शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे एका शिष्टमंडळाने आमदार जोरगेवार यांची भेट घेतली . शिष्टमंडळात सुरेश नारनवरे, एड. पूनमचंद वाकडे, अंकुश वाघमारे, जिल्हाध्यक्ष पंकज ताळे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष बंडू ठमके , विद्याधर लाडे, दिपक तामगडे, विवेक कांबळे, भैय्या मानकर, सुभाष ढोलणे, सिद्धांत पुणेकर, विष्णू चापडे, मुन्ना उराडे, छोटू दहेकर , रवींद्र भैसारे इ. चा समावेश होता .
       बुद्ध धम्माची चळवळ गतिमान करण्याची प्रेरणा या भूमीतून मिळावी या उद्देशाने काही वर्षांपूर्वी चंद्रपूर च्या दीक्षाभूमीवर धम्मचक्र अनुवर्तन दिनाचे आयोजन करणे सुरु झाले आणि अगदी दोनतीन वर्षातच या भूमीवर बौद्ध अनुयायानी लाखोच्या संख्येने हजेरी लावणे सुरु झाले . सध्या अडीच ते तीन लाख अनुयायी या पवित्र भूमीवर येत असतात . परंतु अलीकडे येथे उड्डाणपुल झाल्याने दीक्षाभूमी फारच अपुरी पडत आहे , म्हणून पूर्वी 1956 च्या डॉ. आंबेडकरांच्या उपस्थितीतील धम्मदिक्षा समारंभाच्या मैदानाचा भाग राहिलेला चांदा क्लब ग्राउंड दीक्षाभूमीसाठी देण्यात यावा व खेड्यापाड्यातून येणाऱ्या बौद्ध अनुयायांची प्रचंड होणारी गैरसोय टाळावी , अशी आग्रही मागणी करण्यात आली .
                  बौद्ध अनुयायांच्या संयमाचा शासनाने अंत पाहू नये व लवकरात लवकर निर्णय घ्यावा , अन्यथा बहुजन हितकारिणी सभा शहरातील , जिल्ह्यातील बौद्ध मंडळे व इतर संघटनांच्या समन्वयाने मोठे आंदोलन उभे करेल , असा इशाराही नगराळेनी दिला आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!