रक्षाबंधनाच्या पर्वावर विदर्भ युवा क्रांती संघटनेतर्फे कॅन्डल मार्च काढून घेतली सुरक्षा शपथ

तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - कोलकत्ता येथील आरजीकर मेडिकल कॉलेज मधील ३१ वर्षीय डॉक्टर मोमिता बेबणार हिच्यावर झालेल्या विकृत लैंगिक अत्याचार व हत्येच्या निषेधार्थ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल दुर्योधन  वाघमारे यांच्या नेतृत्वात कॅन्डल मार्चची सुरुवात दिनांक. १९ ऑगस्ट ला पवनी येथील छत्रपती शिवाजी चौक येथून सायंकाळी ०६:०० वाजता  रक्षाबंधनाच्या पर्वावर युवा बांधवांकडून बहिणीची जबाबदारी घेत सुरक्षेची हमी देण्याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक येथे सुरक्षा शपथ कार्यक्रम आयोजित केला. या कॅन्डल मार्च मध्ये पवनीतील युवा व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!