जे. एम. पटेल महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांतर्फे भंडारा शहरातील विविध भागात सायबर जागरूकता मोहीम संपन्न
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक. ०७ ऑगस्ट २०२४ रोजी बुधवारला जे.एम. पटेल महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी शहरातील विविध भागात कार्यक्रम राबविले.आज आपण टेकनॉलॉजिच्या युगात जगत आहोत. सर्व कामे आज टेकनॉलॉजिच्या साहाय्याने अगदी चुटकीसरशी होत असतात. या टेकनॉलॉजिचे अनेक फायदे आहेत. पण या फायद्यांबरोबरच काही धोके सुद्धा आहेत. आणि या धोक्यांपासून सर्वांना सावध करण्याच्या उद्देशाने जे. एम. पटेल महाविद्यालयातील सायबर योद्धयांनी सायबर सुरक्षेसाठी शहरातील विविध भागात जनजागृती केली.
या उपक्रमामध्ये प्राचार्य डॉ विकास ढोमणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सायबर योद्धयांनी महाविद्यालयातून रॅलीद्वारे महात्मा गांधी चौकात जनजागृती केली. याप्रसंगी गांधी चौकात विद्यार्थ्यांनी विविध नागरीकांना सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. कित्येक नागरिकांनी विद्यार्थ्यांकडून आपल्या शंकांचे समाधान करून घेतले.
पुढे विद्यार्थी रॅलीने बस स्टॉप वर आले आणि तेथेही या विद्यार्थ्यांनी प्रवाशांना सायबर सुरक्षेबाबत माहिती दिली. याप्रसंगी प्रवाशांनी सायबर गुन्हेगारीचे विविध प्रकारांची माहिती घेऊन स्वतःला कसे सुरक्षित ठेवायचे याबद्दल माहिती जाणून घेतली. सायबर योद्धयांनी विविध उदारहरणाद्वारे नागरिकांना तसेच त्यांच्या परिवाराला सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित ठेवण्याची शपथ घेतली. जे. एम. पटेल महाविद्यालय आणि जगप्रसिद्ध क्विक हिल कंपनीमध्ये झालेल्या सामंजस्य करारा अंतर्गत "सायबर सुरक्षेसाठी सायबर शिक्षा" या योजनेच्या माध्यमातून घेण्यात आला. या सर्व उपक्रमासाठी जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच महाविद्यालयाचे IQAC चे समन्वयक डॉ. कार्तिक पणीकर यांनी सहकार्य केले. हा संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयातील संगणक विभागाचे प्राध्यापक डॉ. प्रविण घोसेकर, डॉ सबा नसीम, श्री पलाश फेद्देवार, सौ. प्रियंका शर्मा, सौ. फरीना शेख तसेच सर्व विद्यार्थ्यांनी या जनजागृतीच्या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले. .


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!