वरोरा,चिमुर राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई रखडले काम पूर्ण करा - शेरखान पठाण जिल्हाध्यक्ष प्रहार

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमूर ३५३ ई या महामार्गाचे ६ ते ७ वर्षांपासून रस्त्याचे काम सुरू असून महामार्गावरील अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ठिक - ठिकाणी मोठ - मोठे खड्डे पडल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. वरोरा तालुक्यातील परसोडा, शेगाव बू बस स्टॉप ते कलाकुंज हॉटेल मेनरोड वरील स्मशान भूमी पुल , भेंडाळा येथील एस.आर.के कंपनी कार्यलय समोर , चारगाव खुर्द बस स्टॉप , चारगाव बू येथील पुला जवळ, तसेच राळेगाव येथील बेंबळा फाटा राळेगाव ते गुजगव्हाण अशा अनेक ठिकाणी अर्धवट कामामुळे मोठ - मोठी खड्डे पडली असून पावसाळ्यात वाहन चालवताना प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावर मुरूम मातीचा मलबा असल्याने दरवर्षी चिखलाचे साम्राज्य निर्माण आहे, वरोरा शेगाव , चिमुर या मार्गाचे तीन तेरा झाले असून या अर्धवट मार्गातून दुचाकी,चारचाकी , ट्रक बस , चालवीत असताना प्रवाश्यांना तसेच चालकांना जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात वाहने चालवीत असताना चालकाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो, रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते असा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे हे रस्ते चुकवीत असताना खड्ड्यांचा अंदाज लागत नसल्याने वाहने देखील पलटी होत असते तर या खड्ड्यांमुळेच छोटे मोठे अपघात देखील दररोज होत आहे.तसेच दुचाकी स्लीप होऊन घसरगुंडी होत आहे.वरोरा, शेगाव, चिमूर ३५३ ई राष्ट्रिय महामार्ग दिवसेंदिवस जीव घेणा रस्ता होत आहे. हे एस.आर.के कंपनी ने अर्धवट असलेले काम पूर्ण करण्यासाठी वास्तव्यात असलेल्या के.सी.सी कंपनी कडे काम पूर्ण करण्याचे कंत्राट दिले ही कंपनी देखील निष्क्रिय असल्याचे चित्र दिसून येत आहे.वरोरा चिमुर मार्गावर अनेक ठिकाणी चिखलमय खड्डे असून देखील कंपनी आंधळेपणाचे नाटक करीत आहे. त्यामुळे या मार्गाकडे लवकरात लवकर लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना प्रहार संघटनेचे जिल्हाअध्यक्ष  शेरखान पठाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!