पवनी येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पार्टीची बूथ कमिटी बेठक संपन्न


तालुका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - शासकीय विश्राम गृह पवनी येथे भंडारा पवनी विधानसभा गांव निहाय बूथ कमिटी या विषयावर बैठक करुण चर्चा करण्यात आली, व ज्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये बूथ कमिटी तयार झाली त्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये बूथ ची माहिती तालुका अध्यक्ष आणि विधानसभा अध्यक्ष यांना दिली पक्ष वाढी बद्दल चर्चा करण्यात आली.तसेच विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम , तालुका अध्यक्ष कुणाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली निखिल मनोहर गोन्नाडे यांची पवनी शहर अध्यक्ष पदी नियुक्ति करण्यात आली.सर्व मिळून जोमाने कामाला लागू व भंडारा विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षाचा झेंडा रोऊ,तसेच येणाऱ्या आगामी भंडारा विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याने सर्व बूथ बांधणी जोमाने करा असे आव्हान विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम यांनी केले.तर तालुका अध्यक्ष कुणाल पवार यांनी पदाधिकारी यांना विधानसभा निवडणूक जिकण्यासाठी जोमाने काम करण्याचे देखील आदेश दिले.या बैठकीला पवनी येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे तालुका अध्यक्ष कुनाल पवार, विधानसभा अध्यक्ष अजय मेश्राम, तालुका सचिव राकेश हटवार व आदी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!