वाघाच्या हल्यात शेतकऱ्याचा मृत्यू - आठवड्यातील दुसरी घटना

 


सावली - शेतालगत बैल चारायला गेलेल्या सावली तालुक्यातील डोनाळा येथील शेतकरी आनंदराव वासेकर वय 50 वर्षे याचेवर वाघाने हल्ला केल्याने जागीच मृत्यू पावल्याची घटना आज दुपारी घडली आहे.

       कालच रोवना संपल्यामुळे आपले बैल घेऊन कळपात गुराख्यांसोबत बैल चारत असतांना कढोली वनालगत हा हल्ला झाला. या क्षेत्राजवळच मागील बुधवारी सिर्सी येथील दिवाकर आवळे हे वाघाच्या हल्यात मृत पावल्याने तोच नरभक्षी वाघ असावा अशी चर्चा परिसरात आहे.

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!