शिर्डी येथे पेन्शन राज्य महा अधिवेशन



शिर्डी येथील पेन्शन राज्य महा अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातून हजारो राज्य शासकीय कर्मचारी सहभागी होणार

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 2015 पासून 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतरच्या सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना 1982/84 ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी म्हणून 9 वर्ष झाली अविरत कार्य करीत आहे. या लढ्याला यश म्हणून 1 नोव्हेंबर 2005 व त्यानंतरच्या सर्व राज्य शासकीय कर्मचारी यांना मृत्युनंतर ची फॅमिली पेन्शन व ग्रॅच्युइटी, रुग्णता पेन्शन व सेवानिवृत्ती नंतरची graduty लागू झाली. पण सरकार NPS सारखीच सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना कर्मचाऱ्यावर लादू पाहत आहेत. पण महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना 1982/84 च्या जुन्या पेन्शन योजनेवर ठाम आहेत. 
शासनास वठणीवर आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने पेन्शन राज्य महाअधिवेशन 15 सप्टेंबर 2024 ला शिर्डी येथे आयोजन केले आहे. या अधिवेशनास जुन्या पेन्शनपासून वंचित 18 लाख कर्मचारी उपस्थित राहून सरकारला जो जुनी पेन्शन देईल त्यालाच मतदान करू म्हणजेच VoteforOPS चा इशारा देणार आहेत या राज्यअधिवेशनात शासनाने उपस्थित राहून जुनी पेन्शनची मागणी पूर्ण न केल्यास सरकार बदलण्याचा 18 लाख कर्मचारी संकल्प करणार आहेत.

1982/84 ची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी होत असलेल्या शिर्डी येथे दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी होत असलेल्या पेन्शन राज्य महाअधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य राज्य शासकीय कर्मचारी यांनी उपस्थित राहावे असे आव्हान श्री. विपीन धाबेकर जिल्हाध्यक्ष व श्री. लखन साखरे जिल्हा सचिव
महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना चंद्रपूर यांनी केलेलं आहे.



वृत्तांकन
श्री संतोष गावतूरे 
९४०३८७५०१०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!