मूलचे माजी नगराध्यक्षांचे निधन
वासुदेव पाटील लोनबले मूल यांना भावपूर्ण श्रद्धांजली
मुल येथील प्रगतिशील शेतकरी, तत्कालीन ग्राम पंचायत मूलचे सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, मुल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष,माळी महासंघाचे सक्रिय पदाधिकारी,भारतीय किसान संघाचे माजी जिल्हाध्यक्ष, माळी समाजाचे सर्वांना सहकार्य करणारे मनमिळाऊ स्वभावाचे खंदे नेतृत्व करणारे स्व.वासुदेव हरिभाऊ लोनबले पाटील यांचे सोमवार दिनांक २६/८/२०२४ रोजी रात्री ९- ४५ वाजता प्रदिर्घ आजाराने निधन झाले.मृत्यू समयी (६५) वर्षाचे होते. त्यांचा अंत्यसंस्कार आज सकाळी ११-०० वाजता उमा नदीच्या घाटावर स्मशान भूमीत अनेक समाज बांधवांच्या व सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना आणि नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे. माळी महासंघाच्या वतीने,समाजातील अनेक संघटनांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली🙏🏼🙏🏼 *मृतात्म्यास ईश्वर चिरशांती अर्पण करो हीच प्रार्थना*..🙏🏼🙏🏼🙏🏼



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!