धावपटू अमन करमनकर यांची ५ व्यांदा महाराष्ट्र राज्यस्तरीय अथलेटिक स्पर्धेत निवड
महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना द्वारा आयोजित 72 वी राज्यस्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा नागपूर येथे विद्यापीठ मैदानात दिनांक 1 ते 3 जून 2024 रोजी आयोजित केलेली आहे. सदर स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघटनेद्वारे अजिंक्यपद क्रीडा स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन 11 व 12 मे रोजी जिल्हा क्रीडा संकुल चंद्रपूर येथे करण्यात आले होते, सदर स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातर्फे चंद्रपूर जिल्हा अथलेटिक संघात खेळाडू सदस्य म्हणून 10000 मीटर धावणे स्पर्धेत अमन करमनकर, हे खेळाडू सहभागी होतील तसेच प्रशिक्षिका पूर्वा खेरकर व संघ व्यवस्थापक चैताली कन्नाके काम पहातील.
अपयश म्हणजे संकट नव्हे, आपल्याला योग्य मार्गावर आणणारे ते मार्गस्थ दगड आहेत. अशीच काहीशी म्हण आहे घरची परिस्थिती खूपच बेताची वडील कामगार तर आई गृहिणी अतिशय कष्टानं अमनने आपलं सगळ शिक्षण पूर्ण केलं कधी कधी गावामध्ये दगड धोंडे तुडवत धावत रोज शाळेत जाणाऱ्या अमन ने अखेर राज्यस्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा नागपूर मध्ये सलग पाचव्यांदा गवसणी घालत हे यश प्राप्त केलं आहे महाराष्ट्र राज्यस्तरीय अॅथलेटिक्स क्रीडा स्पर्धा नागपूर चॅम्पियनशिप २०२३-२४ १ ते ३ जून २०२४ रोजी नागपूर येथे विद्यापीठ मैदानात होणार असून सिनिअर गटात कुं. अमन करमनकर यांची निवड झाली आहे, तसेच आगामी काळात येणाऱ्या स्पर्धे मध्ये सहभाग नोंदवून यश प्राप्त करू तसेच येणाऱ्या काळा मध्ये अमन करमनकर हे युवकांसाठी प्रेरणास्थान राहील, धावणे स्पर्धा ही फक्त जिंकासाठी नवे तर आरोग्य सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास मदत होते आणि आपण जर राज्यस्तरावर यश प्राप्त केलं तर इतर शासकीय खात्या मध्ये आपल्याला आरक्षण मिळून आपण घवघवित यश संपादन करू शकतो असेही त्यांनी वेळोवेळी विद्यार्थांना मार्गदर्शन करत असतात.
खेळाडुच्या निवडीबद्दल राष्ट्रीय शारीरिक शिक्षण महाविद्यालय, विसापुरचे प्राचार्य व अथलेटिक्स जिल्हा संघटना चंद्रपूर चे अध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल, अथलेटिक्स जिल्हा संघटना चंद्रपूर चे सचिव, सुरेश अडपेवार, श्रीमती. पुर्वा खेरकर, श्रीमती. वर्षा मॅडम, श्रीमती बांबोडे मॅडम, श्री.विक्की पेटकर सर, गौतम कदम सर,( ONGC) कर्मचारी संघटना, पेट्रोलियम संघटना, सौ.भारती ताई पाल (सरपंच ग्रा. पं . बामणवाडा), मा.श्री. ना. सुभाष भाऊ धोटे (आमदार राजुरा विधानसभा काँग्रेस पार्टी ) श्री अनिकेत भाऊ मेश्राम(विवान इंटर प्रायझेस),श्री.अंकुश पारेकर ( तालुका उपाध्यक्ष युवक काँग्रेस कमिटी), श्री सुरज भाऊ ठाकरे ( जिल्हाध्यक्ष,आम आदमी पार्टी), श्री बाळु भाऊ वडस्कर (सरपंच ग्रा.पं.चूनाळा)श्री आनंद नगराळे (पोलिस पाटील बामणवाडा), श्री.पंकज करमनकर, श्री .चैतन्य करमनकर (सचिव, युवक काँग्रेस कमिटी), स्वप्नील वाघमारे, व मित्र परिवार व बामनवाडा, चुनाळा येथील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!