गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हत्तीचा हैदोस
शेतकरी तथा गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
वनविभाग सावली तर्फे जनजागृती कार्यक्रम सुरू
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दिनांक.१२/०४/२०२४ गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हत्ती भटकून आल्याने शेतकरी तथा तालुक्यातील गावकऱ्यांना वनविभाग सावली तर्फे हत्ती पासून सावधान अशी जनजागृती सुरू असल्याने गावकरी तथा शेतकरी यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.परंतु वनविभाग सावली तर्फे ठिक - ठिकाणी वनविभागाचे पथक दाखल झाले आहे.यामुळे गावकरी व शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगावी कुणीही घराबाहेर पळू नये शेतात तथा मोहफुल वेचायला जंगलात जाऊ नये अशीही जनजागृती मोहीम वनविभाग सावली तर्फे राबविण्यात येत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!