रात्रीच्या अंधारात पोलिसांनी पकडले काँग्रेस पदाधिकाऱ्याचे ट्रॅक्टर

सत्ताधारी चोरट्यांना सूट तर सर्वसामान्यास शिक्षा

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : -  चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियाचा हैदोस वाढत चालला आहे. याचे कारण म्हणजे रेती घाटाचे लिलाव न झाल्याने घर तसेच सिमेंट काँक्रीटीकरण रोडचे बांधकामावर मोठ्या प्रमाणावर रेतीची मागणी आहे. त्यामुळे दिवस - रात्र सर्रासपणे रेती माफिया जंगल पाठातून तसेच उमा नदी पात्रातून रेतीची चोरी ट्रॅक्टर द्वारे करतांना आढळून येतात. या माफियांमूळे जनतेची रात्रीची झोप उडाली आहे. पोलिसांची दिनांक.२३/०४/२०२३ ला रात्रीच्या वेळी १२:१० मिनिटांनी पेट्रोलिंग दरम्यान अवैधरित्या रेतीची वाहतूक करतांना वाहतूक नियंत्रण शाखा चंद्रपूर चे पोलीस उप निरीक्षक खैरकर यांनी काँग्रेसचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जाहिद उर्फ जावा शेख यांचा ट्रॅक्टर मुंडा क्रमांक.MH34 AP 4117 ट्रॉली क्रमांक.MH34 A 5754  ला औद्योगिक प्रशिक्षण केंद्र  ( ITI college ) चिमूर जवळ रेतीने भरलेला ट्रॅक्टर पकडून पोलीस स्टेशन चिमूर येथे वेळ १२:४० ला लावण्यात आला. यावेळी चालक राजपाल शंकर सवसाकडे यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत ची चर्चा मोठ्या प्रमाणावर चिमूर शहरात रंगली असून हा सर्व प्रकार फक्त सर्वसामान्य तथा काँग्रेस चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचेवर होतो.परंतु दिवस रात्र २४ तास सत्ताधारी भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सुद्धा रेती , मुरूम , गिट्टी , विटा चे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणावर असतांना सुद्धा त्यांच्यावर महसूल विभाग व पोलीसांची कारवाई होतांना दिसत नाही. माजी सेवानिवृत्त सैनिक तथा वन रक्षक यांच्यावर भ्याड हल्ले केले जातात तलाठ्यांच्या हातातून ट्रॅक्टर पकडलेला हिसकावून पळवून नेले जाते तरीही त्या माफियांवर कारवाई होतांना दिसत नाही. सर्वसामान्याचं बघा वाकुन आणि मोठ्यांचं ठेवा झाकून अशी म्हण आहे ते चुकीची नाही यावरून स्पष्ट होते.असे असतांना देखील प्रशासन झोपी गेलेले नेहमीच दिसून येतात अशी जनतेमध्ये चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!