व्याहाड बुज. आयडीबीआय बँकेचा भोंगळ कारभार - १५ दिवसापासून लिंक फेलचा ग्राहकांना फटका
व्याहाड बुज. आयडीबीआय बँकेचा भोंगळ कारभार - १५ दिवसापासून लिंक फेलचा ग्राहकांना फटका
सावली - ग्रामीण भागातील जनतेला आर्थिक व्यवहार करणे सुलभ व्हावे याकरिता व्याहाड बुज. येथे आयडीबीआय बँकेची शाखा आहे मात्र सलग १५ दिवसापासून लिंक फेल असल्याचे कारण सांगून ग्राहकांना ताटकळत ठेवायचे काम सुरु असल्याने ग्राहकात संताप आहे.
आर्थिक व्यवहार करण्याकरिता बँकेची गरज आहे. सर्व शासकीय आर्थिक व्यवहार बँकेमार्फत केल्या जातात. रोजगार हमी योजना, ग्रामीण भागात निराधार योजना, घरकुल योजना, पीएम किसान योजना, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृती योजना, व इतर योजनेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होत असल्याने बँकेला फार महत्व आहे. व्याहाड बुज भागातील जनतेकरिता आयडीबीआय बँक ही एकमेव बँक आहे. मात्र येथील अधिकारी कर्मचारी यांच्या उद्धट वागणुकीमुळे ग्राहकांना नेहमी त्रास सहन करावा लागतो. मागील दोन आठवड्यापासून लिंक फेल कारणाने नवीन खाता उघडणे, खाता kyc करणे, बँलेन्स तपासणे या सारखे अनेक कामे बंद आहेत. त्यामुळे बँकेच्या कार्यप्रणालीवर ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत व भविष्यात उद्रेक होण्याची शक्यता परिसरात चर्चिली जात आहे.
या बँकेत नेहमी ग्राहकांना त्रास दिल्या जातो. आता तर दोन आठवड्यापासून व्यवहार ठप्प आहेत. अधिकारी लिंकची अडचण सांगत असतात. पण दोन दिवसात हा प्रश्न सुटला नाही तर बँकेला टाळे ठोकू.
@अनिल गुरुनुले@
अध्यक्ष ग्रामीण पत्रकार संघ सावली तालुका


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!