मजुरांनी भरलेल्या टाटा सुमो वाहनाचा अपघात १४ महिला गंभीर जखमी तर ४ महिलांचा मृत्यू

चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतिश वारजूकर यांनी घटनास्थळी दाखल होऊन जखमी महिलांवर केले उपचार

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक.०८/०२/२०२४ एका गावातून दुसऱ्या गावी मजुरीने शेतीच्या कामासाठी जात असलेल्या महिला मजुरांच्या वाहनाचा अपघात झाला. टाटा सुमो गाडी पलटी झाल्याने वाहनातील १३ महिला मजूर गंभीर जखमी झाल्या तर ३ महिला जागीच मृत पावल्या जखमींना तातडीने  सिर्सी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार दिल्यानंतर पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय मेडिकल कॉलेज येथे पाठवण्यात आले.समुद्रपूर तालुक्यातील  सिर्सी  उमरेड रोडवर सिर्सी इथून जवळपास ३ किमी अंतरावर हा अपघात झाला. सध्या शेतीच्या कामांची लगबग सुरू असून  गावात मजूर मिळत नसल्याने  दुसऱ्या गावातून शेतीच्या कामासाठी मजूर आणले जातात याकरिता वाहन वेळेवर उपलब्ध न झाल्याने काहीजण पिकअप करतात तर काही टाटा सुमोची सुविधा करीत असतात अशाच प्रकारे  चिमूर विधानसभा क्षेत्रातील ब्रम्हपुरी तालुक्यातील माहेर [खरबी ] गावातून एकूण १७ महिला चार चाकी सुमो गाडीने सिर्सी जवळील पिपरी येथे चना कापण्यासाठी गेले होते. व स्व गावी परत जात असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला याची माहिती राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश तथा समन्वयक चिमूर विधानसभा क्षेत्र  डॉ. सतिशभाऊ वारजूकर यांना याबाबत ची माहिती मिळताच क्षणी घटनास्थळी धाव घेतली व जखमी महिलांना प्राथमिक उपचारासाठी सिर्सी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे  पाठवण्यात आले. महिला गंभीरित्या जखमी असल्याने पुढील उपचारासाठी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे पाठवण्यात आले.व स्वतः डॉ.सतिशभाऊ वारजुकर यांनी शासकीय मेडिकल कॉलेज नागपूर येथे जाऊन जखमी महिलांवर उपचार सुरू करण्याची व्यवस्था करून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!