डॉ.आनंद किंन्नाके यांना तात्काळ निलंबित करा - प्रशांत कोल्हे शिवसेना उपजिल्हा प्रमुख (उ.बा.ठा)

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - दिनांक ०८/०२/२०२३ रोजी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथील कालबाह्य झालेल्या अम्बुलंसने व उपजिल्हा रुग्णालयाचा अधिकृत नसलेला चालक रुग्ण सोडण्याकरिता गेला होता परत येताना गाडीमध्ये प्यासेंजर भरून चिमूरच्या दिशेने येत असताना गाडीचा अपघात झाला. अपघात झालेल्या रुग्णांना चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. एक स्त्री गंभीर असल्याने तिला रेफर करायचे होते परंतु अपघातातील काही रुग्णांनी आम्हचा पूर्ण खर्चपाणी मिळाल्याशिवाय व उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतल्याशिवाय आम्ही ईथून जाणार नाही. असा आग्रह धरला व तेथे उपस्थित रूग्णालयाचे लिपिक वासनिक यांनी ती जबादारी स्वीकारली व रुग्णांना सोडून देण्याकरिता चिमूर येथील आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या खाजगी रुग्णवाहिकेने सोडून देण्याकरिता शासकीय खर्चातून तीस लिटर डीजेलची स्लीप श्री वासनिक यांचेकडून देण्यात आली. असा प्रकार घडला असतांना रुग्ण वाहिकेचा कसल्याही प्रकारचा पंचनामा करण्यात आलेला नाही. चालकाला सुद्धा ताब्यात घेण्यात आले नाही. त्याची वैद्यकीय चाचणी करण्याची मागणी केली होती ती सुद्धा पोलिसांनी केली नाही. त्यामुळे पोलिसांच्या या भूमिकेवर सुधा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.अश्या प्रकारे डॉ.आनंद किन्नाके वैद्यकीय अधीक्षक प्रभार सांभाळताना स्वतः कर्तव्यात चूक करून शासनाची आर्थिक फसवणूक करीत आहे. शासकीय डिजल, खाजगी रुग्णवाहिका यात वापरता येतो का? हा खऱ्या अर्थाने गंभीर प्रश्न आहे. यावरून चिमूर चे आमदार यांना स्वतः व खाजगी वाहनांना आर्थिक लाभ होत असल्याने डॉ.आनंद किन्नाके यांना आमदारांकडून अभय मिळत आहे. त्यामुळे आमदाराच्या आशीर्वादाने चिमूर उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल, आणि यांना माल मिळत आहे. असे असले तरी शिव सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) रुग्णावर होत असलेला अन्याय कदापीही सहन करणार नाही, डॉ. आनंद किंन्नाके यास तात्काळ निलंबित न केल्यास, दिनांक १२/०२/२०२४ रोज सोमवारला तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही या पत्रकार परिषदेत प्रशांत कोल्हे शिवसेना उपजिल्हा प्रमुख यांनी दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!