दिलीपने दाखविले 'चिखल'—मुनगंटीवारनी फुलविले 'कमळ'!
दिलीपने दाखविले 'चिखल'—मुनगंटीवारनी फुलविले 'कमळ'!
पाच—सात वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. खाटिक समाजाच्या दिलीप पारधी या सामान्य चिकन—मटन व्यावसायीकांनी, तेव्हाचे अर्थमंत्री आणि आताचे वने, सांस्कृतीक व मत्सविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना जवळ—जवळ हात धरूनच जबरीने मूलच्या आठवडी बाजारात नेले, आठवडी बाजारातील दुरावस्था दाखविली, ठिक—ठिकाणी चिखलाचे साम्राज्य, सडलेल्या भाजीपाल्यांची सर्वत्र पसरलेली दुर्गंधी, चिकन—मटन—मच्छी विक्रेत्यांनी फेकलेले आणि कुत्रे—डुकरे यांचेमुळे विखुरलेले सर्वत्र मासाचे अवशेष, बेशिस्त बसलेले भाजी व्यावसायीक आणि अनिर्बंध फिरत असलेले मोकाट जनावरे आणि अशा कल्पनापलिकडील वातावरणात आठवड्यांचा भाजीपाला खरेदी करणारे मूल आणि तालुक्यातील जनता या भागाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उघड्या डोळ्यांनी पाहीली. ही दुरावस्था दूर व्हावी, आरोग्यवर्धक भाजीपाला, मास—मटन ग्राहकांना देता यावे एवढीच अपेक्षा दिलीप पारधी यांनी नामदार मुनगंटीवार यांचेजवळ बोलून दाखविली. नामदार सुधीरभाऊनीही तेवढ्याचे आश्वस्ततेने पाठीवर हात ठेवीत "तुझ्या कल्पनेपलिकडील आठवडी बाजार याच जागेवर होईल, राज्याला हेवा वाटेल असं भाजी मार्केट इथे उभं राहील, अगदी बाजारात भाजी खरेदी—विक्रीलाच नाहीतर मार्केट पहायला, आणि मनाला दिलासा देण्यासाठी लोक फिरायला इथे येईल" असं स्वप्नवत वाटणारे आश्वासन नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिले, राजकीय नेत्यांनी दिलेले आश्वासन हे फारसे गांभीर्याने घ्यायचे असतात, मात्र आश्वासनाला पक्के असणारे सुधीरभाऊचे दिलेले शब्द ही 'गॅरंटी'च असते, हे पुन्हा एकदा 26 जानेवारी 2024 रोजी सिध्द झाले. ज्यांच्या मागणीतून मूल येथील अप्रतिम आठवडी बाजाराचे वैभव उभे झाले, ते दिलीप पारधी आज हयात नसले तरी, दिलीप सारख्या सामान्य माणसांच्या मागणीची दखल घेणारे सुधीर मुनगंटीवार या खर्या अर्थाने लोकप्रिय लोकप्रतिनिधीचा भावपूर्ण सत्कार पारधी कुटूंबियांनी करीत, कृतज्ञता व्यक्त केली.
मूलच्या आठवडी बाजाराचा पूर्वइतिहास
मूल शहरातील आठवडी बाजार तसा पंचक्रोषित प्रसिध्द आहे. ग्राम पंचायतीच्या काळापासूनच दर बुधवारला हा आठवडी बाजार नियमीत भरतो. त्यावेळी भाजी उत्पादकांची मर्यादीत संख्या, वाहतुकीच्या साधनांचा अभाव, माहितीचा अभाव त्यामुळे आठवडी बाजार ही तालुक्यातील सर्व नागरीकांसाठी विशेषत: ग्रामिणांसाठी सणासारखा दिवस असायचा. मूलचा आठवडी बाजार पूर्वी आताची गुजरी आणि गांधी चौक ते सोमनाथ रोड अशा रस्त्याच्या दोनही कडेला भरायचा. पोलीस स्टेशन समोर, गुजरी बाजार ते समर्थ यांचे किराणा दुकान पर्यंत, सारडा साडी सेंटर ची गल्ली, कुंदन टेलर ते मोटवानी यांचे घराची गल्ली, बाजार चौक ते गंधेवार यांचे घरापर्यंत हा बाजार पसरलेला असायचा. हा आठवडी बाजार गर्दीमुळे आणि वाहतुकीच्या कोंडीमुळे तसेही अडचणीचे झाले होते. अनेक छोटे—मोठे अपघातही व्हायचे. याच ठिकाणी भरलेल्या आठवडी बाजारात ४० वर्षापूर्वी सौदागर तंबाकूचे दुकानासमोरून सोमनाथला जाणार्या बसच्या चाकाखाली आलेल्या एका बाजारकरूचा जागीच मृत्यू झाल्यानंतर, तेव्हाचे ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने आताच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाजूला असलेल्या सर्वे नंबर ९०७ मध्ये दर बुधवारचा आठवडी बाजार स्थलांतरीत केले. तेव्हापासून दर बुधवारी कोरोणाचा अपवाद वगळता नियमीत बाजार सुरू आहे. या बाजारात वीज, शौचालय, मुतारी किंवा इतर सर्व नागरी सुविधाचा अभाव होता. नगर परिषदेने सुरूवातीच्या काळात काही भाजी विक्रेत्यांसाठी दुकानाचे गाळे तयार केले होते, मात्र हे काम अर्धवटच राहील्यांने, हे गाळे निकामी राहीले आणि शासनाच्या पैशाचा अपव्यय झाला. मटन मार्केटची इमारत नगर परिषदेने केली होती, मात्र या ठिकाणी पाण्याची व विजेची सुविधा न दिल्यांने, ही इमारत उद्घाटनाआधीच 'भंगार' झाली. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मूलच्या आठवडी बाजाराचा बदलविलेला चेहरा—मोहरा निश्चितच दखलपात्र आहे.
वसुले कडून ‘विकास’ वसुल !
नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे कल्पनेतून मूलच्या आठवडी बाजाराचे संकल्पचित्र तयार झाले, डिजाईन कागदावर आले, आठवडी बाजाराचे काम पूर्ण झाल्यानंतर, ते कसे दिसेल यांचे थ्रीडी प्रेझेंटेशनही झाले. बारीक—सारीक दुरूस्तीही पालकमंत्री मुनगंटीवार यांनी आढावा बैठकीत सांगीतली. मात्र कागदावरची डिजाईन जमिनीवर प्रत्यक्षात साकार करण्याची किमया केली ते मूल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी. त्यांनी केलेल्या सततच्या परिश्रमाने, कल्पकतेने. त्यांनी या कामात आलेल्या प्रत्येक अडचणीवर मात करून, हवे तसेच बाजाराची निर्मिती करून दाखविली.
बगीच्यात बसल्यासारखा वाटतेय!
कोरोणामुळे कर्मवीर महाविद्यालयाचे मैदानावर भरत असलेल्या भाजी बाजारातील प्रशांत लेनगुरे या विक्रेत्यांची चर्चा करतांना, आताचा नवनिर्मीत आठवडी बाजार कसा वाटतोय? या प्रश्नावर जमिनीवर लावलेल्या प्लेविंग ब्लॉक्स आणि सरंक्षक भितींजवळ लावलेल्या सुशोभीत झाडाकडे अंगुलीनिर्देश करीत प्रशांत बोलला, 'बगीच्यात बसल्यासारखा वाटतोय!'
वृत्तांकन - विजय सिध्दावार
9422910167/7588883477




छान वृत्तांकन सर !
उत्तर द्याहटवा