अवैद्यरित्या रेती उत्खनन वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त...
वरोरा... जगदीश पेंदाम
महसुल विभाग रेती तस्करांच्या विरोधात गप्प बसले असताना वन विभागाने मात्र कारवाईचा सपाटा सुरू केला असून अवैधरीत्या रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर कक्ष क्रमांक 14 ब सुरला येथे वनविभागाने कारवाई करत जप्त केलेले आहे, वनरक्षक वरोरा अमोल तिखट, रोजंदारी वनमजूर सकाळी पाचच्या दरम्यान गस्त करीत असताना बामनडोह येथे अवैद्य रेती उत्खनन करताना MH 34 , CD 7841 तसेच MH 34, tc165 हे दोन ट्रॅक्टर आढळून आले असता जप्तीची कारवाई करत रेती भरलेले दोन ट्रॅक्टर जप्त करून वनपरिक्षेत्र कार्यालय वरोरा येते आणण्यात आले,यामध्ये आरोपी म्हणून भास्कर देवाजी राणे, विकास पांडुरंग काळमेंगे, सुमित बबन कारमेंगे, राहणार बांद्रा तसेच ऋतिक महादेव गोंडे राहणार वनली अवैध रेती सहित ट्रॅक्टर टाली व इतर साहित्य सहित por no.09182/229530 अधिनियम 1972 चे कलमनुसार गुन्हा नोंद करून जप्त केल्याची माहिती प्रेस नोट द्वारे वरोरा वनपरिक्षेत्र अधिकारी सतीश शेंडे यांनी दिली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली एच,डी, खोब्रागडे क्षेत्र सहाय्यक वरोरा, क्षेत्र सहाय्यक जे,के,लोणकर शेगाव, व्ही, एम, दुमणे वनपाल, गजानन बोढे वनरक्षक शेगाव, अमोल तिखट वनरक्षक वरोरा यांनी सहकार्य केले असुन अधिक चौकशी करण्यात येत आहे....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!