चिमूर येथिल उपजिल्हा रुग्णालय फक्त नामदारी

प्रत्येक रुग्णांना दिल्या जातोय रेफर स्लिप

उप संपादक
विलास मोहिणकर

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात एकमेव उपजिल्हा रुग्णालय आहे. आणि या रुग्णालयात तालुक्यातील कुठल्याही प्रकारचा रुग्ण आला की त्यावर प्रथमोपचार पध्दतीने उपचार करून काही वेळातच रुग्णालयात साधन सामग्री व तज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने रुग्णास जिल्ह्याला रेफर केल्या जाते.परंतु चंद्रपूर तसेच नागपूर हे अंतर १०० कि.मी. पेक्षा जास्त असून रुग्णास परवडण्यासारखे नसल्याने हे मार्ग सुध्दा धोकादायक आहे. यामुळे रुग्णास वाटेतच नेहमीच जीव गमवावा लागत आहे.याबाबत नेहमीच उप जिल्हा रुग्णालयात वाद होत असून गोरगरीब जनतेला १०८ क्रमांकाचे वाहन वेळेवर उपलब्ध होत नसल्याने सुध्दा जीव गमवावा लागत आहे. याकडे स्थानिक खासदार व आमदार तसेच लोकप्रतिनिधी यांचे सुद्धा दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.याकडे जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हाधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन चिमूर शहरातील उप जिल्हा रुग्णालय याठिकाणी खरोखरच अतिशय अत्यावश्यक गरज कशाची आहे ती कमतरता भरून काढण्यासाठी माहिती संकलन करून त्यावर मार्ग काढणे गरजेचे झाले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!