परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट ची जोरदार हजेरी...
वरोरा....जगदीश पेंदाम
तालुक्यातील परिसरामध्ये सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार गारपिटीने हजेरी लावली असून यात अनेक शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून तालुक्यातील उमरी गावातील एक घराची भिंत पडली आहे अवकाळी आलेल्या वादळी वाऱ्यासह छोट्या मोठ्या गारपीटणे ज्वारी, गहू,जवस, चना, आदी पिकांची व भाजीपाल्यांची, शेतकरी तसेच शेतमजुरांची फार मोठी बिकट अवस्था केली तर अनेक शेतकरी शेतमजूर भर गारपीटीमध्ये तसेच भर पाण्यामध्ये सापडले असल्याने स्वतःचा जीव कसा वाचवायचा यात सर्व नागरिक लागली तसेच मिळेल त्या छताखाली निवारा घेत आपला जीव कसा बसा जीव धरून आपले प्राण वाचवीत होता. अवकाळी आलेल्या या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतात असलेले चना हरभरा, गहू ज्वारी, या सह अनेक पिकाचे मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी दुःखात अडकलेला आहे तेव्हा तात्काळ या परिसराची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकरी यास शेतमजूर यांनी केली आहे.....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!