गोसेखुर्द कॅनॉल मधे रानगवा पडला: तिन तासांचे थरारक रेस्क्यु : रेस्क्यु
तळोधी (बा.)
नागभिड वनपरिक्षेत्रातील जनकापूर परिसरातील गोसेखुर्द नहरात रानगवा पडल्याची घटना आज सकाळी उजेडात आल्याने वनविभाग व स्बाब संस्थाचे सदस्य घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान रात्रीच हा रानगवा ओपन नहरात पडला असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. हा रानगवा अंदाजे बारा ते तेरा वर्षे वयाचा असल्याचे व एक हजार किलो वजनी असलेल्या या रानगव्याला नहरा बाहेर काढण्याकरिता सकाळी नऊ वाजता पासुन रेस्क्यु मोहीम राबविण्यात आली. यावेळी शासनाच्या सदस्यांनी लहरामध्ये दोरीच्या साहाय्याने उचलून वांग्याच्या डोक्यामध्ये शिंगामध्ये दोराचा फासा टाकून दोराचे साहाय्याने तिन तासानंतर सुखरुप बाहेर काढल्यानंतर अधिकाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.
लोकांची गर्दी व पळापळ त्यामुळे एक जख्मी
नहरात पडलेला रानगवा वनविभाग, स्वाब संस्था, तथा स्थानिक नागरिकांचे सहकार्याने नहरा बाहेर काढण्यापूर्वी लोकांना तिथून गर्दी कमी करण्याचे विनंती करूनही लोक आजूबाजूला उभे राहून फोटो व्हिडिओज बनवत होते . काढल्यानंतर दोराने बांधलेला रानगवा पिसाळलेल्या अवस्थेत झाला. परिनामी उपस्थित नागरिकांची एकच धावपळ उडाली. आणि या धावपळीत रानगवा हल्ला करेल म्हणून सैरावैरा नागरिक पळू लागले त्यात ज्ञानेश्वर पडोळे यांचें पायाला गंभीर दुखापत झाली. तर काही अंतरावर ठेवलेल्या एका दुचाकीचे सुद्धा रानगव्याने नुकसान केले.
रानगव्याला यशस्वीपणे बाहेर काढताना एस. बी.हजारे, सहाय्यक वनसंरक्षक व वनपरिक्षेत्र अधिकारी नागभिड, राकेश आहुजा , बायोलाजीस्ट ब्रम्हपुरी, जी.एम. नवघरे, वनरक्षक जनकापुर, सी.एस. कुथे, वनरक्षक नागभीड संस्थेचे यश कायरकर, जिवेश सयाम, नितीन भेंडाळे, भोलेनाथ सुरपाम, महेश बोरकर , गणेश गुरनुले, शुभम निकेशर, यांनी मेहनत घेतली. यावेळी इतर सदस्य उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!