पंचायत समितीने पटकवीला सदभावना क्रिकेट चषक - सावली पोलिस स्टेशनचा स्तुत्य उपक्रम

पंचायत समितीने पटकवीला सदभावना क्रिकेट चषक - सावली पोलिस स्टेशनचा  स्तुत्य उपक्रम
सावली -  महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमीत्याने पोलीस स्टेशन सावली च्या वतीने 'चला एकत्र येऊया..' या घोषवाक्याने सद्भावना क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले आहे. ७ जानेवारी ला पार पडलेल्या अंतिम सामन्यात सावली पंचायत समितीने प्रथम येत चषक पटकवीला तर सावली पोलीस स्टेशनने द्वितीय स्थान पटकाविला.
      महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त सावली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांच्या संकल्पनेतून सदभावना क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्याचे दुसरे वर्ष आहे. तालुक्यातील पत्रकार संघ, पोलीस विभाग, तहसील विभाग, सरपंच संघ, पोलीस पाटील संघ, पंचायत समिती, पाटबंधारे, महावितरण, आपदा संघ, व्यापारी संघ, चालक मालक संघ अशा 16 संघानी सामन्यात सहभाग घेतला. अंतिम सामना पंचायत समिती सावली व पोलीस स्टेशन सावली यांच्यात चुरस झाली. यात प्रमोद जोनमवार यांच्या नेतृत्वातील पंचायत समितीने विरोधी संघातील सर्व खेडाळू बाद करीत चषक पटकावीला. पोलीस स्टेशनने दुसरा क्रमांक पटकावीला. मॅन ऑफ डी मॅच विजेते योगेश सहारे, मॅन ऑफ दी सिरीज विशाल दुर्योधन, बेस्ट बॉलर सुजित भसारकर यांनी सन्मान मिळविला. बक्षीस वितरण पोलीस निरीक्षक आशिष बोरकर, गटविकास अधिकारी मधुकर वासनिक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर नगरसेवक  विजय  मुत्यलवार, उपनिरीक्षक राठोड, माजी सभापती विजय कोरेवार, नगरसेवक प्रफुल वाळके, नगरसेवक सतीश बोम्मावार, नगरसेवक  प्रीतम गेडाम, अनिल गुरुनुले, चंद्रकांत गेडाम, प्रवीण गेडाम, उदय गडकरी, विजय गायकवाड उपस्थित होते. संचालन पत्रकार सूरज बोम्मावार यांनी केले. सर्वांना एकत्र आणण्याच्या उपक्रमाबद्दल पोलीस निरीक्षक आशिष बोरकर यांचे कौतुक केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!