राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेतर्फे गांवडे गुरूजींना श्रद्धांजली अर्पण
चंद्रपूर (प्रतिनिधी)
राष्ट्रसंत विचार साहित्य परिषद आणि झाडीबोली साहित्य मंडळ जिल्हा शाखेच्या वतीने बहुआयामी व्यक्तिमत्त्व दिवंगत गजानन गावंडे गुरुजी यांना आभासी पध्दतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.
आदरांजली सभेत ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, डॉ. श्रावण बानासुरे, पत्रकार प्रभाकर आवारी, एड. राजेंद्र जेनेकर, त्र्यंबक बन्सोड , नामदेव गेडकर, अभय घटे, संजीव पोडे आदींनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्यात . सूत्रसंचालन डॉ. धर्मा गांवडे यांनी केले.
दिवंगत गांवडे गुरूजी हे लोकमान्य टिळक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक तथा इंग्रजी विषयाचे शिक्षक होते . ते शिस्तप्रिय शिक्षक तर होते तसेच त्यांनी सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात खूप मोठे योगदान दिलेले आहे. तसेच ते काही काळ घुटकाळा श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी होते. ते पर्यावरण तज्ज्ञ विजय मार्कंडेवार यांनी स्थापन केलेल्या नॅशनल फाउंडेशन ऑफ इकॉलॉजी एन्ड एनविरोनमेंट चंद्रपूर या संस्थेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाचे योगदान दिले होते. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांच्या कार्यात त्यांना विशेष रूची होती . त्यांच्या अचानक जाण्याने एक सेवाभावी, अभ्यासू आदर्श शिक्षक हरवले आहे. त्यांचे स्मरण सदैव होत राहिल, अशी भावना याप्रसंगी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!