माजी क्रिकेटर अनिल कुंबळे निमढेला गेट (रामदेगी ) पर्यटन सफारी करीता दाखल...
भानुसखिंडी वाघिन व तिचे बच्चे यांचे दर्शन..
वरोरा...जगदीश पेंदाम
देश विदेशात व्याघ्र दर्शनासाठी प्रसिद्ध असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पमध्ये दरवर्षी देश विदेशातील अनेक सिनेकलाकार, मंत्री येत असून या सोबतच सुप्रसिद्ध क्रिकेटरचा वाघ सचिन तेंडुलकर येत असून त्यांच्या परिवाराला सुद्धा ताडोबाच्या मोह लागला दरवर्षी ते आपल्या कुटुंबास या ठिकाणी येत असतात आज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे सहकारी मित्र सुप्रसिद्ध पूर्व क्रिकेटर अनिल कुंबळे यांनी देखील या व्याघ्र प्रकल्पाला भेट देत जंगलाची सफारी करून भानुसखिंडी वाघीण व तिचे तीन बच्चे यांची दर्शन घेत प्रेमात पडले असल्याचे त्यांनी सांगितले या नंतर देखील दरवर्षी आवर्जून येईल अशी ग्वाही दिली.मागील वर्ष भरा पासून निमढेला गेट वर सिलेब्रेटी तसेच क्रिकेटर यांचा ओढा वाघाना पाहण्यासाठी करिता बफ्फर क्षेत्रातील निमढेला गेट वर वाढत असून गेट वरील उत्तम नियोजन आणी गेट इन्चार्ज मिलिंद किटे यांचा तसेच गेट वरील व्यवस्थापन यांचा कडून मिळणारे आदर यांच्यामुळे तसेच या परिसरात छोटा मटका, भानुसखिंडी वाघीण व तिचे बच्चे वाघ दिसण्याची हमी असल्याने मोठ मोठे सिलेब्रेटी आता निमढेला गेट वर येऊ लागले....



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!