नेरी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात लाखोंचा भ्रष्टाचार
रस्त्याची दुरावस्था
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील नेरी या गावातील सर्वात वर्दळीच्या मार्गांपैकी एक मार्ग म्हणजे सावरगाव रोडलगत शंकरजी च्या मंदीरापासून ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेठ विभाग पर्यंतचा रस्ता. पेठ विभाग, तसेच सरडपार म्हसली येथून येणारे जाणारे, तसेच नेरीतील नागरिकांची वर्दळ, सोबतच सामानांची ने आन करणारे वाहन, रेतीची ट्रॅक्टर अशा अनेक कारणांनी हा रस्ता दिवस - रात्र व्यस्त असतो. परंतु खूप वर्षांपासून हा रस्ता कधी पक्का करण्यात आला नाही. आताही शंकरजी मंदीरापासून शंभर मीटर सिमेंट रस्ता करण्यात आला व बाकी पुर्ण रस्ता तसाच आहे याकडे कोणत्याही लोकप्रतिनिधीचे लक्ष नाही सध्या या रस्त्याची खूपच दुरावस्था झालेली आहे. खाचखळगे गड्डे आणि उबडखाबड रस्ता असल्याने चारचाकी दुचाकी वाहनांसहित पायी चालणाऱ्यांना सुद्धा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याकडे नेहमीच शासनाची उदासीनता दिसून आलेली आहे. पेठ विभागातील लोकांचे तर म्हणणे आहे की, या रस्त्याला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार यांचे कडून रस्ता पक्का करणे करिता मंजुरी तसेच निधी मंजूर करण्यात आला. परंतु हा रस्ता फक्त शंभर मिटर करण्यात आला असून लोकांची अशी मागणी आहे. हा रस्ता पुर्ण करून देण्यात यावा आणि सदर मुद्द्याकडे आमदार व ग्राम पंचायत यांनी जातीने लक्ष देऊन हा रस्ता पक्का करून देण्यात यावा अशी मागणी पेठ विभागातील नागरीक करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!