ब्रेकिंग न्यूज ... वाघाच्या हमल्यात रोजंदारी सफाई कामगार ठार....



 पर्यटक गेट निमडेला येथील घटना...
वरोरा ...जगदीश पेंदाम
       तालुक्यापासून 30 किलोमीटर असलेल्या अंतरावर    कक्ष क्रमांक 59 मध्ये निमडला गावातील रामभाऊ रामचंद्र हनवते वय वर्ष 52 हा वाघाच्या हमल्यात ठार झाल्याची घटना घडली आहे..
 
खडसंगी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या कक्ष क्रमांक 59 लगत बफर झोन रामदेगी निमडला पर्यटक गेटवर सकाळच्या सुमारास रोजंदारी सफाई  कामगार रामचंद्र हनवते काम असताना कुठीच्या समोर देवबाबरीत असलेल्या वाघाने हमला करून ठार केले. हि तीन महिन्यात दूसरी घटना घडली आहे.(रामदेगी) बफर झोन क्षेत्रात सध्या भानुसखिंडी तिचे बच्चे  मटकासूर, बबली असे वाघांचे पर्यटकांना दर्शन होत आहे.. सफाई कामगार  यांना ठार करणारा वाघ हे भानुसखिंडीचा बच्चा असल्याचे सूत्राकडून माहिती मिळाली आहे. हे बच्चे मोठ्या प्रमाणात अग्रेसिव असून नेहमीच रामदेगी मध्ये येत असलेल्या भाविकांवर आक्रमक पवित्रा घेत असल्याचेही सांगीतले जातेय.
 सदर घटनेची माहिती परिसरात पसरताच मोठ्या प्रमाणात नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली असून वन विभागाची टिम, शेगाव पोलीस टीम घटनास्थळी दाखल झाले आहे. समोरील घटनेचा पंचनामा चौकशी बफर झोनचे वनपरिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे यांच्या मार्गदर्शनात केले जात आहे....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!