स्वाब संस्था चे वतीने घोडाझरी गावात आरोग्य तपासणी शिबिर
(११७ रुग्णांची तपासणी व औषधी वाटप.)
('स्वाब संस्था व ब्रह्मपुरी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी यांचे वतीने शिबिराचे आयोजन.)
नागभीड प्रतिनिधी:
नागभीड तालुक्यातील घोडाझरी जंगलामध्ये असलेला नावाने प्रसिद्ध मात्र दुर्लक्षित व दुर्गम गाव घोडाझरी येथे स्वाब नेचर केअर संस्था व ब्रह्मपुरी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी यांचे वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस गावातील महिला पुरुष व लहान मुलांनी आपली आरोग्य तपासणी केली. यामध्ये तपासणी करणाऱ्या प्रत्येक रुग्णाला गोळ्या, औषधी, व टॉनिक बाटल यांचे वाटप करण्यात आले.
घोडाझरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळेस आरोग्य तपासणी करण्याकरिता ब्रह्मपुरी येथील प्रसिद्ध डॉक्टर ब्रह्मपुरी हॉस्पिटल अँड रिसर्च इन्स्टिट्यूट ब्रह्मपुरी चे हेड डॉ. खिजेंद्र गेडाम व त्यांची चमू तसेच तळोधी बा. येथील प्रसिद्ध डॉ. गौरव देशमुख, डॉ. दिनेश कामडी, डॉ. घनश्याम कामडी यांनी यावेळेस रुग्णांची आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधींचे वाटप केले. सोबतच या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये ज्या रुग्णांना हायड्रोसिल व हर्निया चा त्रास आहे त्यांनी व आलेल्या गरजू लोकांचे ऑपरेशन मोफत करण्यात येईल असी हमी दिली.
यामध्ये गावातील गावकरी यांनी यात लाभ घेतला. यामध्ये एकूण ११७ लोकांनी आरोग्य तपासणी शिबिरात लाभ घेतला. यावेळी ब्रह्मपुरी चे प्रसिद्ध डॉ. खिजेंद्र गेडाम यांची समूह तळोधीचे डॉ. गौरव देशमुख, डॉ. दिनेश कामडी, डॉ. घनश्याम कामडी यांनी आरोग्य तपासणी केली.
हा शिबिर अत्यंत सुरळीत व चांगल्या पद्धतीने आयोजित करण्यात आला याबद्दल स्वाब सदस्य हर्षवर्धन रंधये घोडाझरी त्यांचे व गोविंदपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच्या सौ. शालू हांडेकर, यांनी आयोजित कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
नेहमी जंगलालगतच्या गावांमध्ये विविध उपक्रम राबविणारी स्वाब नेचर केअर संस्था च्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष यश कायरकर, सल्लागार सदस्य श्री उत्तम जी मुंगमोडे, महीला विभाग प्रमुख सौ कल्पना गेडाम मैडम, छत्रपती रामटेके, विनोद लेनगूरे, सुरज भाकरे, अमन करकाडे, शुभम निकेशर, अमीर करकाडे व इतर सदस्य उपस्थित होते.






कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!