जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात बांधले शिवबंधन..



जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात बांधले शिवबंधन..

भद्रावती /वरोरा/..जगदीश पेंदाम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या  वतीने पक्षाचे कार्य घरोघरी पोहोचविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख आमदार भास्कर जाधव , जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम व विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे यांच्या मार्गदर्शनात व जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वात जनसंपर्क अभियान राबविले जात आहे. या जनसंपर्क अभियानात शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या कामाचा लेखाजोखा  सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. या जनसंपर्क अभियानाला ग्रामीण भागात उत्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ  जिवतोडे यांच्या जनसंपर्क अभियानामुळे  शिवसेनेत अनेकांची इन्कमिंग सुरू आली आहे.ग्रामीण भागातील असंख्य युवक शिवसेनेच्या कार्याला प्रेरित होऊन व जिल्हाप्रमुख मुकेशभाऊ जिवतोडे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.भद्रावती तालुक्यातील चक तीरवंजा (कवठी ) येथील जनसंपर्क अभियानादरम्यान गावातील असंख्य युवक व पुरुषांनी व सरपंच शंकरभाऊ भोगेकर, विधानसभा संघटक सुधाकर मिलमिले, सचिन बोढाले, प्रकाश  कुरेकार, व गोविंद बदकी यांच्या सहकार्याने शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश घेतला. यावेळी समस्त शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!