स्मशानभूमीत श्रमदान करून नागदिवाळी साजरी...
वरोरा...जगदीश पेंदाम
इथून जवळ असलेल्या अर्जुनी तुकून गावात दोन दिवशी कार्यक्रम नागदिवाळी उत्सव साजरा करण्यात आला आहे..
यावेळी गावात वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यामध्ये महिला मेळावा, विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, गावातील मुख्य मार्गाने महीलांनी दिवे घेऊन रॅली काढत नागदिवाळीची सुरुवात करण्यात आली, तसेच गावातील महिला, विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिकांनी स्मशानभूमीची स्वच्छता करून नागदिवाळी महोत्सव साजरा केला.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे अरुण चौधरी, प्रकाश झाडे वरोरा, संतोष चौखे, संजय जांभुळे, गावातील सरपंच हनवते,लक्षमी हनवते,कोकेवाडा, नीलिमा वनकर वायगाव आदी नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी गावातील सर्व नागरिकांनी सहकार्य केले...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!