नवभारत कन्या विद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती साजरी
नवभारत कन्या विद्यालय मुल येथे आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अल्का राजमलवार या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होत्या. माजी मुख्याध्यापिका सौ मंगला सुंकरवार, ज्येष्ठ शिक्षिका अर्चना बेलसरे, उज्वला चहांदे, टी.व्ही. रामटेके, मंजुषा पंधरे मंचावर उपस्थित होत्या.
यानिमित्ताने विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे भाषणे केली. मी सावित्री बोलते या विषयावर एकपात्री नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. समीक्षा रामटेके आणि वैष्णवी चटारे या दोन विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले व फातिमा शेख यांच्यातील संवादातून केलेले नाट्य सादरीकरण अप्रतिम ठरले.
कार्यक्रमाची सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन अक्षरा गुलबमवार हिने तर आभार प्रदर्शन आंबुलकर हिने मानले



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!