STARS प्रकल्प अंतर्गत शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडले
STARS प्रकल्प अंतर्गत शिक्षकांचे तालुकास्तरीय प्रशिक्षण पार पडले
शिक्षण विभाग, पंचायत समिती मुल तर्फे नवभारत कन्या विद्यालय मुल येथे STARS प्रकल्प सन २०२३-२४ अंतर्गत तालुकास्तरीय अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मुल्यमापन विषयावर दिनांक १८/१२/२०२३ ते २२/१२/२०२४ या कालावधीत पाच दिवसीय प्रशिक्षण पार पडले. हे शिबिर नवभारत कन्या विद्यालय मुल येथे संपन्न झाले.
गटशिक्षणाधिकारी वर्षा पिपरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षणाचे उद्घाटन शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुज्जनवार, यांच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून सुरवात करण्यात आली. या प्रसंगी विस्तार अधिकारी कुंभारे सर, केंद्र प्रमुख दयाराम भाकरे, वासुदेव आत्राम, प्रमोद कोरडे सर, कोपुरवार सर उपस्थित होते.
प्रशिक्षण वर्ग १ ते ५ वी पर्यंतच्या सर्व माध्यमांच्या शाळेतील शिक्षकासाठी होते. शिक्षकांचे अध्ययन- अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे तसेच सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन करणे, यासाठी तालुक्यातील १४८ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षण मार्गदर्शक म्हणून नवनीत कंदलवार, विजय निखारे, मुकेश मॅकलवार, घनश्याम पेंदाम, सचिन बल्लावार, युवराज ठाकरे, शंकर दडमल, शैलेश देवाडे यांनी भुमिका पार पाडली तर प्रशिक्षण नियोजन यशस्वी करीता विषय साधन व्यक्ती सचिन पुल्लावार, आनंद गोंगले, सुरेश चटारे, माया झरकर कल्पना दुधानी, निलीमा रापत्तीवार व सर्व गट साधन टिम यांनी परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!