ड्रॅंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह कारवाईसाठी सावली पोलीस सज्ज - गडचिरोली सीमेवरील बार मालकांमध्ये खळबळ

ड्रॅंक अ‍ॅन्ड ड्राईव्ह कारवाईसाठी सावली पोलीस सज्ज -  गडचिरोली सीमेवरील बार मालकांमध्ये खळबळ
सावली (विजय कोरेवार) - जुन्या वर्षाचा शेवट व नवीन वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रात्रभर दारू दुकाने सुरु ठेऊन तळीरामांसाठी विशेष सोय केली आहे. मात्र कायदा व सुव्यवस्था नीट राखण्यासाठी सावली पोलीसही सज्ज झाले आहे. या दरम्यान ड्रॅंक अँड ड्राईव्ह च्या केसेसची भीती तळीरामाना तर आहेच मात्र चंद्रपूर गडचिरोली सीमेवरील दारू दुकानदारांना  विक्रीस अडथळा होत  असल्याने त्यांच्यामध्येही खळबळ माजली आहे. 
      "ए मानव सुनले बात, व्यसन को छोड दे सारे, तेरा और बडेगा नाम, प्यारे कर नेकी से काम" असा व्यसनमुक्तीचा संदेश राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिला आहे . परंतु शासनाने मात्र महाराजांच्या स्वछतेचा संदेश घेतला पण व्यसनमुक्तीचा नाही. म्हणून नवीन वर्षाचा स्वागत चांगल्या विचाराने न करता रात्रभर दारूची दुकाने उघडी ठेऊन तळीरामासाठी पिऊन मौजमस्तीची सोय करून दिली आहे.  
      31 डिसेंबरच्या रात्री नवीन वर्षांच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळते. या उत्साहाच्या वातावरणात कायदा व सुव्यवस्थेला तडा जाऊ नये, यासाठी सावली पोलीस स्टेशन सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतावेळी दारू पिऊन वाहने चालविणारे अपघात घडवितात. त्याचेवर ड्रंक अँड ड्राईव्ह ची कारवाई करून त्यांचे वाहन सुद्धा जप्त करण्यात येणार आहे.

चंद्रपूर- गडचिरोली सीमेवरील दारू दुकानदारांमध्ये खळबळ
      गडचिरोली जिल्हा हा दारूबंदी जिल्हा आहे. या जिल्ह्यातील तळीरामांची पिण्याची व्यवस्था व्हावी म्हणून सीमेवर अनेक दारूची दुकाने सुरु आहेत. ही दुकाने गडचिरोली जिल्ह्याच्या तळीरामांवर अवलंबुन आहेत.  नववर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर दारू दुकाने सुरु ठेवण्याची शासनाने परवानगी दिली आहे मात्र ड्रॅंक अँड ड्राईव्ह ची कारवाई होणार असल्याने भीतीपोटी गडचिरोली जिल्ह्यातील तळीराम सीमा ओलांडून दारू दुकानात येणार नाही त्यामुळे दारूची खप होणार नाही. परिणामी गडचिरोली जिल्ह्यासाठी निर्माण झालेले दारू दुकान आर्थिक संकटात येणार असल्याने दारू दुकानदारांमध्ये खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!