आणखी एका वाघाचे संशयास्पद मृत्यू , सावली वनपरिक्षेत्रातील घटना.
(आज चौथ्या दिवशी पुन्हा एका तिसऱ्या वाघाचा मृत्यू, चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात एकूण 22 वाघांचा मृत्यू , डिसेंबर 2023 वाघांसाठी ठरतोय दुःखद .)
यश कायरकर,
वन विभाग चंद्रपूर अंतर्गत येणाऱ्या सावली वनपरिक्षेत्रातील, व्याहाड उपक्षेत्र मधील सामदा बीट, येथे गोसेखुर्द कालव्याचे बाजूला एका शेतात वाघ मृत अवस्थेत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली.
घटनास्थळाची पाहणी केली असता मृतक वाघ हा अंदाजे सहा ते सात महिने वयाचा वाघाचा नर छावक असल्याचे आढळून आले. वाघा दोन ते तीन दिवसापूर्वी मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज असून वाघाच्या तोंडाला जखम असल्याने तेथे आढळून आले. त्यानुसार परिसरातून मोठ्या प्रमाणात रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या एखाद्या हायवा ट्रकने किंवा रेती तस्करी करणाऱ्या गाडीने धडक दिल्याने या वाघाच्या छावकाचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज घटनास्थळावरून निदर्शनास येते. यावेळेस एन टी सी ए चे प्रतिनिधी बंडूभाऊ धोत्रे यांच्या उपस्थितीमध्ये मोक्का पंचनामा व शवविच्छेदन करून वाघाला जाळण्यात आले.
संबंधित घटनेवरून वन गुन्हा दाखल करून समोरील तपास डी.एफ.ओ. खाडे यांच्या मार्गदर्शनात सावली चे वनपरिक्षेत्र अधिकारी राजूरकर हे करीत आहेत.
ही चार दिवसातील परिसरातील तिसरी घटना असून त्यात शिंदेवाही वनपरिक्षेत्रातील मेंढा माल येथील एका खासगी शेत शिवारात गट क्रमांक 164 मध्ये शिकारी करिता लावलेल्या विद्युत प्रवाहात एक वाघ 21 डिसेंबर ला व आज 24 डिसेंबर ला तळोधी वनपरिक्षेत्रामध्ये कठळा नसलेल्या विहिरीत पडून आज आनखी एक वाघ वृत्त असल्याची घटना निदर्शनास आली यामुळे येत्या चार दिवसात तीन वाघ मेल्याच्या घटना घडल्या आशा आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात या वर्षामध्ये वर्षभरात एकूण 21 वाघ मेल्याच्या खळबळ जनक घटना घडल्या. यामधील काही घटना आपसी संघर्षातून, काही शिकारी मध्ये, तर काही अपघाती मृत्यू झाल्याच्या घटना यामुळे वन विभागासाठी चिंतेचा विषय झालेला आहे. यामुळे जिल्ह्यामध्ये, वन विभागामध्ये खडबड माजलेली आहे . तर वन्यजीव प्रेमींमध्ये दुःखाची लहर पसरली आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!